05 July 2020

News Flash

इमरान हाश्मीवर पुस्तक

बॉलीवूडच्या कलाकारांवरील पुस्तकांमधूनही त्यांचे जीवन आणि अभिनय प्रवासाविषयी चाहत्यांना कळते.

मुलाला झालेल्या कर्करोगाशी दिलेला लढा पुस्तकातून उलगडणार
बॉलीवूड सेलिब्रेटी ‘स्टार’च्या खासगी जीवनाबद्दल सर्वसामान्यांना तसेच या स्टारच्या चाहत्यांना खूप कुतूहल असते. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमातून त्याबाबत माहिती मिळत असते. बॉलीवूडच्या कलाकारांवरील पुस्तकांमधूनही त्यांचे जीवन आणि अभिनय प्रवासाविषयी चाहत्यांना कळते. या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष हा नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. बॉलीवूडचा स्टार इमरान हाश्मी याच्यावर लवकरच एक पुस्तक प्रकाशित होणार असून तेही सर्वसामान्यांना मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरू शकते.

इमरान हाश्मी याच्या मुलाला कर्करोग झाला होता. मुलाच्या कर्करोगाशी त्याने आणि आपण कसा लढा दिला, यातून आपण काय शिकलो हे इमरान या पुस्तकातून सांगणार आहे. सध्या या पुस्तकावर त्याचे काम सुरू असून पुढील वर्षी हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. ‘पेंग्विन बुक इंडिया’ ही प्रकाशन संस्था हे पुस्तक प्रकाशित करणार आहे.आपल्या लहान मुलाच्या कर्करोगासारख्या मोठय़ा आजाराशी इमरानने जो लढा दिला त्यावर हे पुस्तक प्रकाशित करत असल्याची माहिती प्रकाशन संस्थेने ‘ट्विटर’च्या माध्यमातून दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2015 4:03 am

Web Title: emraan hashmi to author book on sons battle with cancer
टॅग Emraan Hashmi
Next Stories
1 वपु ऑनलाइन
2 शाहीद म्हणतो, आता चुंबनदृश्य नाही
3 चित्रचौकटींतून उलगडणारा ‘ख्वाडा’
Just Now!
X