News Flash

जेव्हा लॉर्ड्सच्या मैदानात रणवीरने घेतली क्रिकेटच्या देवाची भेट

याच पावसाच्या निमित्ताने क्रिकेट आणि बॉलिवूड विश्वातील दोन दिग्गज व्यक्तींची भेट झाल्याचं पाहायला मिळालं.

क्रिकेटची पंढरी असेलल्या लॉर्ड्सवर भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यामध्ये दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे क्रिकेटपटूंबरोबरच चाहत्यांचीही निराशा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र याच पावसाच्या निमित्ताने क्रिकेट आणि बॉलिवूड विश्वातील दोन दिग्गज व्यक्तींची भेट झाल्याचं पाहायला मिळालं.

भारत- इंग्लंड यांचा सामना पाहण्यासाठी आणि भारताला प्रोत्साहन देण्यासाठी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने लॉर्ड्सच्या मैदानावर हजेरी लावली होती. मात्र ऐनवेळी आलेल्या पावसामुळे रणवीरला हा सामना पाहता आला नाही. त्यामुळे रणवीरच्या नशिबात सामना पाहणं नसलं तरी मास्टरब्लास्टर सचिन तेंडूलकर याची भेट घेणं होतं. त्यानुसार या ठिकाणी रणवीर आणि सचिन यांची भेट झाली. या भेटीचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

रणवीरने या मैदानावरील दोन फोटो शेअर केले असून एका फोटोमध्ये तो एकटाच दिसून येत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्याच्याबरोबर सचिन तेंडूलकर आणि चित्रपट दिग्दर्शक कबीर खान दिसून येत आहे. रणवीरप्रमाणेच कबीरनेही काही फोटो शेअर केले असून त्याला साजेसं कॅप्शन दिलं आहे.

सचिन ज्यावेळी ९ वर्षांचा होता त्यावेळी म्हणजे १९८३मध्ये कपिल देव यांनी सामना जिंकून वर्ल्ड कप उचलला होता. त्यावेळी हा विश्वकप पाहून सचिन प्रोत्साहित झाला आणि त्याने देशासाठी स्वत:ला झोकून दिलं, असं कबीर यांनी म्हटलं आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 12:20 pm

Web Title: england vs india ranveer singh in lords with sachin tendulkar and kabir khan
Next Stories
1 VIDEO : घरकाम करणारी महिला ते स्टँडअप कॉमेडियन, सोशल मीडियावर मराठमोळ्या दीपिकाची चर्चा
2 निक जोनासनं दिला साखरपुड्याच्या वृत्ताला दुजोरा
3 कारगीलमधल्या ‘त्या’ शूरवीराची व्यक्तीरेखा साकारणं माझ्यासाठी आव्हानात्मक
Just Now!
X