News Flash

ब्रूस लीसोबत फाईट केलेल्या अभिनेत्याचं उपचारादरम्यान निधन

वयाच्या ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध अभिनेता जॉन सेक्सन यांचं निधन झालं आहे. ते ८३ वर्षांचे होते. त्यांची पत्नी ग्लोरिआ मार्शल यांनी जॉनच्या निधनाची बातमी दिली. गेल्या काही दिवसांपासून ते निमोनियामुळे त्रस्त होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झालं. जॉन सेक्सन यांच्या निधनामुळे हॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

अवश्य पाहा – ३० वर्षीय अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांनी सुरू केली चौकशी

अवश्य पाहा – ‘दिल बेचारा’मुळे अनुपम खेर यांच्या डोळ्यांतून वाहू लागले अश्रू; म्हणाले…

जॉन सेक्सन हॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेता होते. ते एक उत्तम मार्शल आर्टिस्ट होते. त्यामुळे प्रामुख्याने त्यांना अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखले जायचे. १९५४ साली त्यांनी ‘इट्स हॅपन टू यू’ या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘अ स्टार ईन बॉर्न’, ‘रनिंग वाईल्ड’, ‘धिस हॅप्पी फिलिंग’, ‘द बिग फिशरमॅन’ यांसारख्या काही रोमँटिंक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. परंतु त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती ‘एन्टर द ड्रायगन’ या चित्रपटानं. या चित्रपटात त्यांनी चक्क सुपरस्टार फायटर ब्रूस लीसोबत फाईट केली होती. त्यांनतर ‘क्विन ऑफ ब्लड’, ‘इव्हिल आय’, ‘ब्लॅक ख्रिसमस’ या चित्रपटांनी त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेलं. जॉन सेक्सन यांच्या निधनामुळे हॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2020 1:04 pm

Web Title: enter the dragon fame john saxon dies at 83 mppg 94
Next Stories
1 गावकऱ्यांनी तलावाला दिलं सोनू सूदचं नाव; अभिनेता म्हणाला…
2 मल्लिका शेरावतला पाहण्यासाठी चाहत्यांनी केलं ट्रॅफिक जॅम; व्हिडीओ होतोय व्हायरल…
3 सुपरस्टार पवन कल्याणच्या चाहत्यांकडून राम गोपाल वर्माच्या ऑफिसवर दगडफेक
Just Now!
X