‘इरॉस इंटरनॅशनल’ ही भारतातील सर्वात मोठ्या चित्रपट तयार करणाऱ्या कंपन्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. ‘थ्री इडियट्स’, ‘बजरंगी भाईजान’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘बदलापूर’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती या कंपनीने आजवर केली आहे. आता या भारतीय कंपनीने ‘एस. टी. एक्स एन्टरटेन्मेट’ या हॉलिवूड कंपनीसोबत करार केला आहे. या कराराअंतर्गत या दोन कंपन्या मिळून येत्या काळात काही बिग बजेट चित्रपटांची निर्मिती करणार आहेत.

१० मार्च २०१४ साली ‘एस. टी. एक्स’ ही कंपनी सुरु झाली. खरं पाहता ही कंपनी अगदी सहा वर्ष जुनी आहे. त्यामुळे वॉल्ड डिस्ने, फॉक्स स्टार किंवा वॉर्नर ब्रदर्ससारख्या महाकाय कंपन्यांसारखा सुवर्ण इतिहास या कंपनीकडे नाही. मात्र अल्पावधीच ‘द फॉरेनर’, ‘द बॉय’, ‘माईल २२’, ‘अग्ली डॉल्स’ यांसारखे बिज बजेट सुपरहिट चित्रपट तयार करुन आपली यांनी आपली योग्यता सादर केली. आता या कंपनीने त्यांच्या चित्रपटांचा भारतात प्रसार व्हावा यासाठी इरॉस कंपनीसोबत करार केला आहे. लॉस एंजेलिस टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार सध्या हा करार ५०-५० टक्यांच्या नफ्यावर झाला आहे.