News Flash

जाणून घ्या, इशाने का ठेवलं मुलीचं नाव ‘मिराया’ !

इशाला यापूर्वी राध्या नावाची एक मुलगी असून तिचं नावदेखील चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय होता

अभिनेत्री इशा देओल दुसऱ्यांदा आई झाली असून काही दिवसांपूर्वीच तिने एका मुलीला जन्म दिला आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही गुड न्यूज दिली आहे. त्यासोबतच आपल्या बाळाचं नावही जाहीर केलं आहे. इशाने तिच्या बाळाचं नाव मिराया असं ठेवलं आहे. मिराया हे नाव नवी आणि तितकंच हटके असल्यामुळे या नावाचा अर्थ जाणून घेण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. त्यासाठी इशाने स्वत: हा या नावाचा खुलासा केला आहे.

“इशाला यापूर्वी राध्या नावाची एक मुलगी असून तिचं नावदेखील चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय होता. मात्र मुंबई मिररशी बोलताना तिने दोन्ही मुलींच्या नावाचा अर्थ आणि हे नाव ठेवण्यामागील कारण सांगितलं. इशाच्या मोठ्या मुलीचं नाव राध्या असं असून हे नाव भगवान श्रीकृष्णाशी संबंधित आहे. ज्यावेळी श्रीकृष्ण आणि राधा यांची पूजा केली जाते. त्यावेळी या पुजेला राध्या असं म्हटलं जातं. तर मिराया ही श्रीकृष्णाची भक्त आहे. त्यामुळेच या दोन्ही मुलींची नाव भगवान श्रीकृष्णाशी निगडीत असल्याचं” तिने सांगितलं.

पुढे ती म्हणते, “राध्या आणि मिराया या दोघांच्या नावामध्ये मला एक साम्य दिसून येतं. त्यासोबतच जेव्हा या दोघींच्या नावाचा उच्चार केला जातो, त्यावेळी एक सकारात्मक ध्वनी त्यातून येत असल्याचा भास मला होतो”.

दरम्यान, इशाने २०१२ मध्ये व्यावसायिक भरत तख्तानीसोबत लग्नगाठ बांधली. त्यांना राध्या तख्तानी ही पहिली मुलगी असून तिचा जन्म २०१७ साली झाला. राध्या सध्या दोन वर्षांची आहे. इशा ‘कॅटवॉक’ या शेवटच्या लघुपटात दिसली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2019 3:40 pm

Web Title: esha deol reveals why she named her second daughter miraya ssj 93
Next Stories
1 Video: ‘साहो’चा टीझरपाहून प्रेक्षकांचा झिंगाट डान्स
2 पी.टी.उषा यांच्या भूमिकेसाठी कतरिनासोबत आता जॅकलिनही शर्यतीत?
3 Photo : ‘पानिपत- द ग्रेट बेट्रेयल’मधील अर्जुनचा नवा लूक एकदा पाहाच
Just Now!
X