अभिनेत्री इशा देओलच्या घरी पुन्हा पाळणा हलणार आहे. इशा दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिनं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ही गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे. इशा २०१२ मध्ये भरत तख्तानीसोबत विवाहबंधनात अडकली या दाम्पत्याला एक मुलगी देखील आहे.

 वाचा : बाळाचं नाव काय ठेवू? ‘अनिता भाभी’नं मागितली चाहत्यांकडून मदत

आई हेमा मालिनी इतकं बॉलिवूडमध्ये यश न लाभल्यानं इशानं या क्षेत्राला रामराम ठोकला. काही वर्षांपूर्वी इशा मुंबईस्थित व्यावसायिक भरत तख्तानीसोबत विवाहबंधात अडकली. इशाला एक वर्षांची राध्या नावाची छोटी मुलगी आहे. इशानं राध्याचा फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे मी लवकरच ताई होणार आहे अशी ओळ लिहिती इशानं ही आनंदाची बातमी दिली आहे.

इशा ‘कॅटवॉक’ या शेवटच्या लघुपटात दिसली होती. धूम, जस्ट मॅरिड, क्या दिल ने काहा, काल, डार्लिंग यांसारख्या अनेक चित्रपटात तिनं काम केलं आहे. मात्र हे चित्रपट बॉलिवूडमध्ये फारसे यशस्वी झाले नाहीत त्यानंतर  इशानं बॉलिवूडला सोडचिठ्ठी दिली.