अभिनेत्री इशा देओलने सात महिन्यांत पहिल्यांदाच आपल्या लहानग्या मुलीचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. हा फोटो इतका आणि गोड आहे की नेटकऱ्यांनी या फोटोवर भरभरुन प्रतिक्रिया दिल्या. तसेच हा फोटो अनेकदा रिट्विटही केला.
राध्या तखतानी आमची प्रेमळ मुलगी! या आशयाचे ट्विट करत इशाने आपल्या मुलीचा पहिलावहिला फोटो शेअर केला आहे. या फोटोला हजारो शेअर्स आणि रिट्विट्स मिळाले आहेत.

राध्याने या फोटोत फिकट गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला आहे. तर डोक्यावर त्याच रंगाचा हेअर बँडही लावला आहे. या फोटोत तिचे हसू अत्यंत मोहक आहे. इशा देओल आपले खासगी आयुष्य सोशल मीडियापासून लांब ठेवते. त्यामुळे मुलीच्या जन्मानंतर तिने तातडीने फोटो ट्विट केला नाही. सुमारे ७ महिन्यांनी तिने आपल्या मुलीचा पहिलावहिला फोटो ट्विट केला आहे. राध्याची ही झलक सुंदर आहे यात काहीही शंका नाही.

राध्याचा जन्म झाला त्यावेळी इशाचे पती भरत हे खूप भावनिक झाले होते. मला माझ्या भावना आवरणे कठीण होते आहे असे ट्विट त्यांनी त्यावेळी केले होते. तसेच माझी मुलगी माझ्यासारखीच दिसते आहे. हे क्षण माझ्यासाठी अमूल्य आहेत अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले होते.