27 September 2020

News Flash

बहिण अहानाची इशा देओलला ‘सरप्राइज’ बेबी शॉवर पार्टी

संपूर्ण देओल कुटुंबासाठी हा एक आनंदाचा क्षण होता.

इशा देओल, भरत तख्तानी

बॉलिवूड अभिनेत्री इशा देओल लवकरच आई होणार आहे. इशा आणि भरत तख्तानी यांचं हे पहिलंच बाळ आहे. नुकताच इशाचा बेबी शॉवरचा कार्यक्रम पार पडला. संपूर्ण देओल कुटुंबासाठी हा एक आनंदाचा क्षण होता. यावेळी इशाची बहिण अहाना देओल वोहराने मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये तिच्यासाठी सरप्राइज बेबी शॉवर पार्टीचं आयोजन केलं. इशाचा आवडता रंग लवेंडर (फिक्कट जांभळा रंग) असल्याने पार्टीची थीमसुद्धा लवेंडरच ठेवण्यात आलेली.

गेल्या काही महिन्यांपासून अहाना या पार्टीच्या थीमवर काम करत होती. पार्टीमध्ये इशा लवेंडर रंगाच्या शिफॉन लेस विंटेज गाऊनमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती. पार्टीत येणाऱ्या पाहुण्यांमध्ये ज्यांना मुलगी होईल असं वाटतं त्यांना गुलाबी रंगाचा ड्रेस आणि ज्यांना मुलगा होईल असं वाटतं त्यांना निळ्या रंगाचा ड्रेस घालण्यास सांगण्यात आलेलं. यासोबतच पार्टीमध्ये विविध खेळही खेळले गेले.

या सरप्राइज पार्टीबद्दल अहाना म्हणते की, ‘तीन वर्षांपूर्वी जेव्हा मी गरोदर होते, तेव्हा इशाने माझ्यासाठी अशीच सरप्राइज पार्टी आयोजित केली होती. म्हणून इशासाठीही मी तेच करण्याचं ठरवलं होतं. आम्हा बहिणींसाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे. भरतनेही माझी खूप मदत केली. इशासाठी गाऊन डिझाइन करण्यासाठी तिच्या मापाची गरज होती. तिला कळू न देता गाऊनचा माप भरतने मिळवून दिला.’

VIDEO : …म्हणून जया बच्चन यांचा राग झाला अनावर; चाहत्याला म्हणाल्या मूर्ख

पार्टीपूर्वी इशा आणि भरतने बेबी शॉवर कार्यक्रमात एकमेकांशी पुनर्विवाह केला. पारंपरिक सिंधी पद्धतीने हा पुनर्विवाह पार पडला. यावेळी जया बच्चन, डिंपल कपाडिया आणि रश्मी ठाकरेही हजर होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 10:39 am

Web Title: esha deol sister ahana deol throws a surprise baby shower party for her
Next Stories
1 ‘अक्षयसारखी सुधारणा सलमान, आमिरमध्येही नाही’
2 VIDEO : …म्हणून जया बच्चन यांचा राग झाला अनावर; चाहत्याला म्हणाल्या मूर्ख
3 PHOTOS : चिमुकल्या मिशाने आजीसोबत केली शॉपिंग
Just Now!
X