09 March 2021

News Flash

इशा देओलला कन्यारत्न, जाणून घ्या तिच्या बाळाचं नाव

चाहत्यांसाठी इशाने आपल्या बाळाचं नाव लगेच जाहीर केलं आहे

इशा देओल

अभिनेत्री इशा देओलच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. इशाला कन्यारत्न झालं असून ती दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही गुड न्यूज दिली आहे. त्यासोबतच आपल्या बाळाचं नावही जाहीर केलं आहे. इशा २०१२ मध्ये भरत तख्तानीसोबत विवाहबंधनात अडकली या दाम्पत्याला एक मुलगी देखील आहे.

इशा देओलने आपल्या मुलीचं नाव मिराया तख्तानी असं ठेवलं आहे. इशाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने चाहत्यांचे आभारदेखील मानले आहेत. माझ्या बाळासाठी तुम्ही दिलेल्या प्रेम आणि शुभेच्छांमुळे तुमचे मनापासून आभार असं इशाने म्हटलं आहे. बॉलिवूड सेलिब्रेटी त्यांच्या बाळांची नाव काय ठेवणार याकडे कायमच चाहत्यांचं लक्ष लागलेलं असतं. त्यामुळे इशाने चाहत्यांसाठी आपल्या बाळाचं नाव लगेच जाहीर केलं. इशाने तिच्या पहिल्या मुलीच्या नावाप्रमाणेच दुसऱ्या बाळाचं नावही नवीन आणि अर्थपूर्ण ठेवल्याचं पाहायला मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

Thank you very much for the love & blessings@bharattakhtani3 #radhyatakhtani #mirayatakhtani

A post shared by Esha Deol (@imeshadeol) on

इशाने २०१२ मध्ये व्यावसायिक भरत तख्तानीसोबत लग्नगाठ बांधली. त्यांना राध्या तख्तानी ही पहिली मुलगी असून तिचा जन्म २०१७ साली झाला. राध्या सध्या दोन वर्षांची आहे. विशेष म्हणजे इशाने दुसऱ्यांदा आई होणार असल्याची माहिती सोशल मीडियावर दिली होती. त्यानंतर तिने तिच्या प्रेग्नंसी संदर्भातील अनेक अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर केले होते. तिच्या बेबीशॉवरची देखील प्रचंड चर्चा रंगली होती.

दरम्यान, इशा ‘कॅटवॉक’ या शेवटच्या लघुपटात दिसली होती. धूम, जस्ट मॅरिड, क्या दिल ने कहा, काल, डार्लिंग यांसारख्या अनेक चित्रपटात तिनं काम केलं आहे. मात्र हे चित्रपट बॉलिवूडमध्ये फारसे यशस्वी झाले नाहीत त्यानंतर  इशानं बॉलिवूडला सोडचिठ्ठी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2019 11:57 am

Web Title: esha deol welcomes her second baby girl ssj 93
Next Stories
1 सलमानने फेडले ‘राइझिंग स्टार ३’ विजेत्याच्या वडिलांचे कर्ज
2 रितेश देशमुख का म्हणतोय, ‘स्माइल प्लीज’
3 संजय गुप्ता यांच्या चित्रपटात जॉन अब्राहम व इम्रान हाश्मी येणार एकत्र
Just Now!
X