01 December 2020

News Flash

‘सुपर वुमन’! ड्रीमगर्लला मुलीने दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

हेमा मालिनी यांच्यासाठी इशाची खास पोस्ट, म्हणाली...

बॉलिवूडची ड्रीमगर्ल म्हणजे अभिनेत्री हेमा मालिनी. उत्तम अभिनय शैली आणि सौंदर्याच्या जोरावर हेमा मालिनी यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. आजही त्यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. त्यामुळेच शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) त्यांच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. मात्र, या सगळ्यात लक्ष वेधणारी पोस्ट ठरली ती त्यांच्या लाडक्या लेकीची, म्हणजेच अभिनेत्री इशा देओल हिची. इशाने खास शब्दात आपल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.सोबतच तिने हेमा मालिनी यांचा एक फोटोदेखील शेअर केला आहे.

“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देवाचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी रहो आणि तू अशीच स्वस्थ, निरोगी रहा. माझी सुपर वुमन”, अशा आशयाचं कॅप्शन इशाने या फोटोला दिलं आहे. या फोटोमध्ये हेमा मालिनी यांच्यासोबत इशादेखील आहे. विशेष म्हणजे इशाची पोस्ट पाहिल्यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यावर कमेंट करत हेमा मालिनी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, ७०-८० चा काळ गाजवणाऱ्या हेमा मालिनी या आजही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असल्याचं दिसून येतं. ‘जॉनी मेरा नाम’, ‘क्रांती’, ‘नसीब’, ‘सत्ते पे सत्ता’, ‘सीता और गीता’, ‘ड्रीम गर्ल’, ‘शोले’ आणि ‘बागबान’ या चित्रपटामधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 9:52 am

Web Title: esha deol wish hema malini 72nd birthday ssj 93
Next Stories
1 प्रेमासाठी त्यांनी ओलांडला ‘उंबरठा’; स्मिता पाटील यांची लव्हस्टोरी
2 आमिर खानचा मुलगा करतोय बॉलिवूडमध्ये पदार्पण; या चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
3 माधुरीला वाचवण्यासाठी आमिताभ-गोविंदा यांनी गुंडांसोबत केली होती फाईट; पाहा व्हिडीओ…
Just Now!
X