28 September 2020

News Flash

“मी गरीबांची अँजेलिना जोली नाही”; अभिनेत्रीने व्यक्त केला संताप

'या' भारतीय अभिनेत्रीला गरीबांची अँजेलिना म्हणून चिडवतात.

बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता सोशल मीडियावर मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती आपल्या मादक फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून कायम चर्चेत असते. तिचे फोटो पाहून अनेकदा तिला ‘गरीबांची अँजेलिना जोली’ असं म्हटलं जातं. परंतु ही तुलना ईशाला मात्र फारशी आवडत नाही. अँजेलिना हा शब्द ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकात जायची असं ती म्हणाली.

अवश्य पाहा – ‘महाभारता’मध्ये या WWE सुपरस्टारने साकारलेली ‘भीम’ ही व्यक्तिरेखा

ईशा गुप्ता बॉलिवूडमधील प्रसिद्ध आभिनेत्री आहे. अलिकडेच तिने न्यूज लगूनला दिलेल्या मुलाखतीत आपल्या फिल्मी करिअरवर गप्पा मारल्या. यावेळी तिने अँजेलिनासंदर्भात आपला अनुभव सांगितला. ती म्हणाली, “अँजेलिना आणि माझ्यात बरंच साम्य आहे. त्यामुळे अनेकदा माझी तुलना तिच्यासोबत केली जाते. ही तुलना सौंदर्यापुरती मर्यादित असेल तर ठिक आहे. परंतु अनेक जण दोघांच्या करिअरमध्येही तुलना करतात. अँजेलिना नक्कीच माझ्यापेक्षा जास्त यशस्वी आहे. परंतु त्यामुळे मला ‘गरीबांची अँजेलिना’ म्हणून पुकारणं योग्य नाही. सुरुवातील ही तुलना ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकात जायची. प्रचंड राग यायचा. मात्र आता मला त्याची सवय झाली आहे. आता मी माझ्या रागावर नियंत्रण करायला शिकली आहे.”

अवश्य पाहा – विकासचा छोटा भाऊही आला; ‘आत्मनिर्भर’वरून अभिनेत्याचा मोदींना टोला

 

View this post on Instagram

 

A post shared by Esha Gupta (@egupta) on

ईशा गुप्ता एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. २०१२ साली जन्नत २ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर रुस्तम, राज ३, बेबी, हमशकल, कमांडो २ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ईशा चित्रपटांमधील हॉट सीन्समुळे प्रचंड चर्चेत असते. अभिनयासोबत ती फॅनश मॉडलींग क्षेत्रातही कार्यरत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2020 2:46 pm

Web Title: esha gupta admits she was annoyed when people called her gareebon ki angelina jolie mppg 94
Next Stories
1 “ही घटना पाहतोय हेच आपलं दुर्दैव”; अम्फन चक्रीवादळामुळे आयुषमान झाला दु:खी
2 मोहनलाल यांनी वाढदिवशी प्रेक्षकांना दिली भेट, ‘दृश्यम २’चा टीझर प्रदर्शित!
3 Video : स्थलांतरित मजुरांचं जगणं मांडणारा ‘कच्चे दिन’ प्रदर्शित
Just Now!
X