‘जन्नत २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री इशा गुप्ता सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते. कधी बोल्ड लूकमुळे तर कधी नेटकऱ्यांना दिलेल्या बेधडक उत्तरामुळे ती प्रकाशझोतात आल्याचे पाहायला मिळाले. आता पुन्हा एकदा इशा चर्चेत येण्यामागचे कारण म्हणजे सोशल मीडियावर तिने पोस्ट केलेले काही फोटो.

नुकतेच इन्स्टाग्रामवर तिने काही फोटो पोस्ट केले असून ते पाहता इशाने ओठांची सर्जरी केल्याचा अंदाज लावला जात आहे. तिचे काही जुने फोटो आणि आता पोस्ट केलेले फोटो यांमध्ये तिच्या चेहऱ्यात बदल सहज दिसून येत आहे. त्यामुळेच नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. याआधीही इशा बऱ्याचदा तिच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर ट्रोल झाल्याचे पाहायला मिळाले. तिने ओठांची सर्जरी केली की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नसून मेकअपमुळे हा बदल दिसून येत असल्याची शक्यताही काहींनी वर्तवली आहे. त्यामुळे आता इशा स्वत: यावर काय उत्तर देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

https://www.instagram.com/p/Bd7pkJtAMMi/

https://www.instagram.com/p/BeAIyQHgJQJ/

https://www.instagram.com/p/BeC5PI4ADF4/

वाचा : सिनेमाऐवजी क्रिकेटमधील इरफानला शुभेच्छा दिल्या आणि…

अजय देवगणच्या ‘बादशाहो’ या चित्रपटात भूमिका साकारलेली इशा ‘आँखे २’ या थरारपटात झळकणार असल्याचेही म्हटले जात आहे.