News Flash

“दिल्ली नेमकी कुठे आहे?”; नेपाळच्या पंतप्रधानांना इशाचा उपरोधिक टोला?

जाणून घ्या इशा नेमकं काय म्हणाली होती.

“भारतात असलेली अयोध्या ही बनावट आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी होते” असे खळबळजनक वक्तव्य नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी केले. भारताने सांस्कृतिक आक्रमण करुन बनावट अयोध्या निर्माण केली. वास्तवातली अयोध्या नेपाळमध्ये आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नसून नेपाळी आहेत असे वक्तव्य नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी केले. त्यांच्या वक्तव्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्ताने केलेल्या ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या ट्विटमधून तिने नेपाळच्या पंतप्रधानांना उपरोधिक टोला लागावला असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण तिने केलेल्या ट्विटमुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

इशाने उपहासात्मक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये तिने ‘भारताच्या नकाशामध्ये दिल्ली कुठे आहे कोणी मला सांगेल का? भूगोल मला गोंधळात टाकतय’ असे तिने म्हटले होते. पण या ट्विटनंतर तिला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले.

एका यूजरने तुझा हँगओवर अजून उतरला नाही असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने तुला माहिती नाही तर तु का विचारतेस असे म्हणत तिला ट्रोल केले आहे.

काय म्हणाले होते नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली ?

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली हे सातत्याने भारतावर निशाणा साधत आहेत. सोमवारी ओली यांनी सांस्कृतिक अतिक्रमणासाठी भारताने बनावट अयोध्या निर्माण केल्याचा दावा केला आहे. अयोध्या भारतात नसून नेपाळमध्ये आहे. प्रभू रामचंद्र हे भारतीय नाही तर नेपाळी असल्याचेही त्यांनी म्हटले. कवी भानुभक्त आचार्य यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले. इतकच नाही तर नेपाळवर सांस्कृतिकदृष्ट्या अत्याचार केला गेल्याचेही म्हटले. याआधी करोना संसर्गावरुनही त्यांनी भारतावर टीका केली होती. भारतातून येणार करोनाचे संक्रमण हे चीन आणि इटलीतून येणाऱ्या संक्रमणापेक्षा जास्त घातक आहे असे त्यांनी म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 7:14 pm

Web Title: esha gupta pokes fun at nepal pms ayodhya statement avb 95
Next Stories
1 ‘जिंदगी ना मिलेकी दोबारा’साठी हृतिक-अभय ऐवजी या कलाकारांची करण्यात आली होती निवड
2 “…तर स्टार सिस्टम आता संपून जाईल”; दिग्दर्शकाने साधला बॉलिवूडवर निशाणा
3 रणवीर सिंग जगात भारी! सेलिना गोमेजला पछाडत ठरला सर्वाधिक लोकप्रिय सेलिब्रिटी
Just Now!
X