News Flash

सारा खानचा न्यूड व्हिडिओ चुकून सोशल मीडियावर पोस्ट

बहिण आयरा खाननेच इन्स्टा स्टोरीमध्ये अपलोड केला साराचा न्यूड व्हिडिओ आणि चूक लक्षात येताच तो डिलीट केला.

सारा खानचा न्यूड व्हिडिओ चुकून सोशल मीडियावर पोस्ट

‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमधली माजी स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री सारा खानचा न्यूड व्हिडिओ तिच्या बहिणीने चुकून सोशल मीडियावर पोस्ट केला. ही चूक लक्षात येताच साराची बहिण आयरा खानने तो व्हिडिओ डिलीट केला. मात्र तोपर्यंत तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

सारा आणि तिची बहिण आयरा एका कार्यक्रमानिमित्त सध्या श्रीलंकेत आहेत. आयरा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या श्रीलंका दौऱ्याचे बरेच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहे. अशातच इन्स्टा स्टोरी अपलोड करताना तिच्याकडून साराचा बाथटबमधला न्यूड व्हिडिओदेखील चुकून पोस्ट झाला. ही चूक लक्षात येताच आयराने इन्स्टा स्टोरीमधून तो व्हिडिओ लगेच डिलीट केला. मात्र तोपर्यंत त्या व्हिडिओचे काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले.

वाचा : ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारचं इन्स्टाग्रामवर पदार्पण

‘बिदाई’ या मालिकेत साकारलेल्या साधनाच्या भूमिकेमुळे सारा घराघरात पोहोचली. त्यानंतर तिला ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये पाहिलं गेलं. याआधीही बऱ्याचदा वादात अडकलेल्या साराने आता पुन्हा एक वाद ओढवून घेतला आहे हे नक्की.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 5:27 pm

Web Title: ex bigg boss contestant sara khan sister accidentally leaks her nude video deletes it later
Next Stories
1 ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारचं इन्स्टाग्रामवर पदार्पण
2 Top 5: ‘या’ पंजाबी अभिनेत्री टाकतील दीपिका- कतरिनाला मागे
3 आणखी एका प्रेमाचा संघर्ष रुपेरी पडद्यावर; ‘झिंग प्रेमाची’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X