18 November 2017

News Flash

‘बिग बॉस’चा माजी स्पर्धक अपघातात जखमी; मदतीऐवजी पोलीस फोटो काढण्यात मग्न

अपघातातून विवेक सुखरुप बचावला

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: September 13, 2017 8:28 PM

विवेक मिश्रा

टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमुळे प्रकाशझोतात आलेला विवेक मिश्रा याच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे. लखनऊ येथून दिल्लीला परतत असताना विवेकची कार दुसऱ्या कारला धडकली. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, त्यानंतर विवेकला पोलिसांकडून वाईट वागणूक मिळाली. यावेळी मला मदत करायची सोडून पोलीस माझे फोटो काढण्यातच मग्न होते, असे विवेकने सांगितले.

‘इंडियन एक्स्प्रेस’ने विवेकला संपर्क साधला असता तो म्हणाला की, ‘मंगळवारी लखनऊमध्ये माझ्या कारचा अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की त्यात माझ्या कारची अवस्था अत्यंत वाईट झाली. ब्रेक न लागल्याने माझी कार दुसऱ्या कारला धडकली. मी कारमध्ये पुढच्या सीटवर बसलो होतो पण सुदैवाने मला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. या अपघातामधून सुखरूप बचावल्यामुळे मी देवाचे आभार मानतो.’

वाचा : दिग्दर्शक अपूर्व लाखियाला सेन्सॉर बोर्डाकडून ‘बर्थ डे’ गिफ्ट

स्वत:ला न्यूड योग प्रशिक्षक म्हणवणाऱ्या विवेकने ‘बिग बॉस’च्या सातव्या सिझनमध्ये भाग घेतला होता. या सिझनमध्ये अभिनेता कुशल टंडनसोबत झालेल्या वादानंतर तो चर्चेत आला होता.

First Published on September 13, 2017 8:28 pm

Web Title: ex bigg boss contestant vivek mishra meets with an accident police were busy in taking photos instead of helping him