News Flash

‘इंडियन आयडॉल’च्या माजी स्पर्धकाला चोरी प्रकरणी अटक

चैनीचं आयुष्य जगण्यासाठी करायचा चोरी

सूरज बहादूर

‘इंडियन आयडॉल’ (२००८) या संगीतावर आधारित रिअॅलिटी शोचा माजी स्पर्धक सूरज बहादूरला चोरीच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सूरज आणि त्याच्या एका साथीदाराला रणहौला परिसरात झालेल्या चोरीप्रकरणी अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार या अटकेनंतर पाच इतर चोरीच्या प्रकरणांचाही उलगडा झाला. चैनीचं आयुष्य जगण्यासाठी चोरी करत असल्याची कबुली सूरजने दिली.

सूरजविरोधात दिल्लीत चोरीचे २४ गुन्हे दाखल आहेत. मुंबईत राहणाऱ्या सूरजने कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली असून ‘इंडियन आयडॉल’सोबतच तायक्वांदो स्पर्धेतही राष्ट्रीय स्तरावर दोन सुर्वणपदकं जिंकली आहेत.

सूरजजवळून एक पिस्तूल, काळी मिरी पावडरचा स्प्रे आणि एक स्कूटर हस्तगत करण्यात आले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार सूरजचे वडील मुंबई उच्च न्यायालयाचे वकील असून त्याची वर्तणूक बघून त्याला घराबाहेर काढण्यात आले होते. २०१४ मध्ये सूरजला पहिल्यांदा जनकपुरी पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून ४९ मोबाइल फोन जप्त करण्यात आले होते. त्यानंतर जून २०१७ मध्ये त्याला टिळकनगर पोलिसांनी चोरी प्रकरणात पुन्हा एकदा अटक केली होती. इतकंच नाही तर, १४ दिवसांपूर्वीच कारागृहातून जामिनावर त्याची सुटका करण्यात आली होती. जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा तो चोरी करू लागला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2017 7:17 pm

Web Title: ex contestant of indian idol suraj bahadur arrested for robbery
Next Stories
1 अक्षयच्या ‘त्या’ आक्षेपार्ह टिप्पणीचा अर्थ ट्विंकलने सांगितला
2 तुला महिलांचा आदर करता येत नाही; सुनीता राजवारचा नवाजुद्दीनवर पलटवार
3 …अन् सोना मोहपात्राने विद्याला सुनावले खडे बोल
Just Now!
X