News Flash

फरहान अख्तरच्या ‘तूफान’ सिनेमावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रिव्ह्यू , सिनेमा पाहून म्हणाला…

'तूफान' सिनेमाला मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादामुळे फरहानने देखील चाहत्यांचे आभार मानले आहेत.

(Photo-instagram@sachintendulkar)मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 'तूफान' सिनेमाचा थोडक्यात रिव्ह्यू केलाय.

फरहान अख्तरचा ‘तूफान’ सिनेमा नुकताच अ‍ॅमेझान प्राइमवर रिलीज झालाय. या सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसतेय. बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने तूफान सिनेमाचं कौतुक केल्यानंतर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘तूफान’ सिनेमाचा थोडक्यात रिव्ह्यू केलाय. सचिनने त्याच्या इन्स्टा स्टोरीला फरहानसोबतचा एक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.

सचिनने त्याच्या पोस्टमध्ये ‘तूफान’ सिनेमातील कलाकारांचं कौतुक केलंय. या पोस्टमध्ये तो म्हणाला, ” परेश रावल, फरहान अख्तर, मृणाल ठाकूर आणि इतर सर्वच कलाकांनी उत्कृष्ट काम केलंय. सिनेमा पाहताना मजा आली. आपली उर्जा योग्य कामात खर्च केल्यास महान कार्य घडू शकतं हे सिनेमात पाहायला मिळतं. हे भूमिका जिवंत करण्यासाठी फरहानने घेतलेली मेहनत दिसून येत आहे.” असं म्हणत सचिन सिनेमाच्या संगीतासाठी शंकर-एहसान-लॉय आणि सिद्धार्थ महादेवनचं कौतुक करायला विसरलेला नाही.

sachin-tendilkar-toofan-movie-review-farhan (Photo-instagram@sachintendulkar)

हे देखील वाचा: “मग जरा पेट्रोलच्या दरावर लिहा”; ‘त्या’ ट्वीटनंतर बिग बी अमिताभ बच्चन ट्रोल

‘तूफान’ या सिनेमाची कथा ही मुंबईत राहणाऱ्या अज्जू म्हणजेच अजीज अलीच्या जिद्दीची कहाणी आहे. गुंडगिरी ते बॉक्सर असा अज्जूचा प्रवास या सिनेमात पाहायला मिळतो. तर या सिनेमात परेश रावल यांनी अज्जूच्या कोचची भूमिका साकारली आहे. याशिवाय अभिनेत्री मृणाल ठाकूर या सिनेमातील मुख्य अभिनेत्री असून अज्जू आणि अनन्याची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय.

दरम्यान ‘तूफान’ सिनेमाला मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादामुळे फरहानने देखील चाहत्यांचे आभार मानले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 3:57 pm

Web Title: ex cricketer sachin tendulkar review on toofaan film said farhan akhtar paresh rawal and mrunal thakur super performance kpw 89
Next Stories
1 “पडलीस ना गटारात”; ‘तारक मेहता…’मधील बबीताच्या फोटोंवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट
2 सावळ्या रंगामुळे ‘या’ अभिनेत्रीला मिळत नव्हते चित्रपट; बॉलिवूडमध्ये बराच संघर्ष करावा लागला
3 प्रार्थना महत्वाची की प्रार्थनेचा आवाज? ‘भोंगा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
Just Now!
X