News Flash

विजय मल्ल्याच्या लग्नाला एक्स किंगफिशर कॅलेंडर गर्ल्स उपस्थित राहणार का ?

मल्ल्याच्या लग्नाला कॅलेंडर गर्ल्स उपस्थित राहणार?

एकेकाळचा मद्यसम्राट पण आता फरार आरोपी असलेल्या विजय मल्ल्यासाठी मागचा काही काळ अत्यंत वाईट गेला आहे. पण आता त्याच्या व्यक्तिगत आयुष्यात काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार विजय मल्ल्या तिसऱ्या लग्नाची तयारी करत आहे. प्रसारमाध्यमांमध्ये जी चर्चा आहे त्यानुसार मल्ल्या गर्लफ्रेंड पिंकी लालवाणीसोबत विवाहबद्ध होणार आहे. मल्ल्या देश सोडून पळाला तेव्हा पिंकी सुद्धा त्याच्यासोबत लंडनला गेल्याची माहिती आहे. याआधी मल्ल्याचे दोन विवाह झाले आहेत. एअर होस्टेस समीरा त्याबजी आणि रेखा मल्ल्या ही विजय मल्ल्याच्या पूर्वपत्नींची नावे आहेत.

आता चर्चा अशी आहे कि, मल्ल्याच्या तिसऱ्या लग्नाला एक्स किंगफिशर कॅलेंडर गर्ल्स उपस्थित राहणार?. या एक्स किंगफिशर गर्ल्स कोणी साध्यासुध्या मॉडेल नसून बॉलिवूडमधल्या आजच्या आघाडीच्या अभिनेत्री आहेत. दीपिका पदुकोण, कतरिना कैफ आणि नर्गिस फाखरी यांनी कधीकाळी किंगफिशरच्या हॉट कॅलेंडरसाठी फोटोशूट केले होते. किंगफिशरच्या वार्षिक कॅलेंडर्ससाठी बॉलिवूडच्या या सौंदर्यवतींनी खास बिकनी फोटोशूट केले होते.

दिपिका आजची बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. याच दिपिकाचे काहीवर्षांपूर्वी विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ बरोबर नाव जोडले गेले होते. त्यावेळी दिपिकाचे सिद्धार्थसोबतचे आयपीएल सामन्यांमधले अनेक फोटो प्रसिद्ध झाले होते. कतरिना कैफला इंडस्ट्रीमध्ये सलमान खानने हात दिला हे सर्वांना माहित आहे. पण सुरुवातीच्या दिवसांमध्ये कतरिनाला किंगफिशरच्या कॅलेंडर फोटोशूटमुळे ओळख मिळाली होती.

कतरिनाचा पहिला चित्रपट बूम बॉक्स ऑफिसवर आपटला पण किंगफिशरच्या कॅलेंडरमुळे तिच्याकडे मीडियाचे लक्ष वेधले गेले. रॉकस्टारमध्ये दमदार परफॉर्मन्स देण्याआधी अभिनेत्री नर्गिस फाखरीला सुद्धा किंगफिशरच्या कॅलेंडरमध्ये झळकली होती. उदयोन्मुख मॉडेल्स आणि अभिनेत्रींसाठी किंगफिशरचे कॅलेंडर एक उत्तम प्लॅटफॉर्म होता. या कॅलेंडरबद्दल बरीच उत्सुक्ता असायची.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2018 4:10 pm

Web Title: ex kingfisher girls vijay mallyas wedding
टॅग : Vijay Mallya
Next Stories
1 ‘त्या’ तिघांमुळे माझ्या आयुष्याची कहाणीच बदलली- सनी लिओनी
2 बेपत्ता असल्याच्या चर्चांनंतर कॉमेडियन सिद्धार्थने पोस्ट केला ‘हा’ व्हिडिओ
3 रणबीरमुळे कतरिना- आलियाच्या मैत्रीत फूट?
Just Now!
X