News Flash

‘स्टुडंट ऑफ द इयर २’मध्ये नव्या- जुन्या स्टुडंट्सचं गेट-टुगेदर?

करणच्या नव्या- जुन्या स्टुडंट्सची टोळी प्रेक्षकांची मनं जिंकणार का, हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

'स्टुडंट ऑफ द इयर २'

निर्माता- दिग्दर्शक करण जोहरच्या कोणत्याही चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळते. सध्याच्या घडीला आपल्या मुलांना जास्त वेळ देणाऱ्या करणने पुन्हा एकदा त्याचा मोर्चा चित्रपटांकडे वळवला आहे. सध्या तो ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये व्यग्र असून काही दिवसांपूर्वीच त्याने या चित्रपटातील मुख्य कलाकारांची नावं सर्वांसमोर जाहीर केली होती. त्यात आता करणच्या नव्या आणि जुन्या स्टुडंट्सचा गेट-टुगेदर पाहायला मिळणार आहे.

पहिल्या भागाच्या अगदी उलट यामध्ये दोन नायिका आणि एक नायक असणार आहे. अभिनेता टायगर श्रॉफ याची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटातून अनन्या पांडे आणि तारा सुतारिया हे नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि आज तिघांचीही इंडस्ट्रीत स्वतंत्र अशी ओळख निर्माण झाली आहे. आता दुसऱ्या भागात वरुण आणि सिद्धार्थ पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे नव्या आणि जुन्या स्टुडंट्सचं गेट- टुगेदर पाहणं प्रेक्षकांसाठी औत्सुक्याचं ठरेल यात काही शंका नाही.

वाचा : एकता कपूर घेऊन येणार ‘गेम ऑफ थ्रोन्स’चं देसी व्हर्जन?

करणच्या या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटातील तिघांचाही फर्स्ट लूक फारच लक्षवेधी ठरत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 3:47 pm

Web Title: ex students varun dhawan and sidharth malhotra to feature in student of the year 2
Next Stories
1 अमिताभ बच्चन यांच्यामुळेच माझ्यासारख्यांना काम मिळतंय- ऋषी कपूर
2 एकता कपूर घेऊन येणार ‘गेम ऑफ थ्रोन्स’चं देसी व्हर्जन?
3 माहिती प्रसारण मंत्रालयावर संतापले मराठी कलाकार
Just Now!
X