News Flash

भारत आणि दक्षिण आफ्रिकेत चित्रपट पुरस्कारांचीही देवाणघेवाण

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील मनोरंजन उद्योगामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी या हेतूने पहिल्यावहिल्या ‘साऊथ आफ्रिका इंडिया फिल्म अ‍ॅंड टेलीव्हिजन अ‍ॅवॉर्ड्स’ (साईफ्ता)चे आयोजन करण्यात आले आहे.

| July 24, 2013 07:29 am

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील मनोरंजन उद्योगामध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी या हेतूने पहिल्यावहिल्या ‘साऊथ आफ्रिका इंडिया फिल्म अ‍ॅंड टेलीव्हिजन अ‍ॅवॉर्ड्स’ (साईफ्ता)चे आयोजन करण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यात दरबान येथे होणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन सैफ अली खान करणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिके तील मनोरंजन उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची माहिती नुकतीच हॉटेल ‘ताज लँड’ येथे झालेल्या एका कार्यक्रमात देण्यात आली. या पुरस्कारांच्या निवड समितीत दोन्ही देशातील मान्यवरांचा परीक्षक म्हणून सहभाग असणार आहे. भारताकडून ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान, दिग्दर्शक मुकेश भट, अभिनेता बोमन इराणी, दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा आणि नृत्यदिग्दर्शिका फराह खान यांची परीक्षक समितीवर नेमणूक करण्यात आली आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या वतीने अभिनेता-लेखक वेलकम सोमी, टीव्ही कलाकार सायरा एसा, पीटर रोव्हरिक, लिंडा बुखोसिनी, कॅरोलिन स्मार्ट आणि अभिनेत्री लेलेती खुमालो हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. ‘सेलिब्रिटी लॉकर’ या मुंबईस्थित इव्हेंट कंपनीने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन के ले असून ६ सप्टेंबरला दरबन येथे हा सोहळा होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2013 7:29 am

Web Title: exchange of film awards in india and south africa
Next Stories
1 मनोरंजन क्षेत्रातील भंपकपणा आणि गुणवंतांच्या उपेक्षेचे वास्तव! ‘श्री चिंतामणी’चे नवे नाटक ‘ती गेली तेव्हा’
2 मनोज कुमार यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
3 गोविंद निहलानी ‘द्रोहकाल-२’ च्या विचारात
Just Now!
X