News Flash

सुशांत-अंकिताचे ‘पॅच अप’?

कॉफी हाऊसमध्ये भेटल्यानंतर दोघांनीही एकमेकांशी शांतपणे चर्चा केली.

सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे

बॉलिवूड आणि टेलिव्हिजन क्षेत्रात गेल्या वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या. कोणाच्या आयुष्याला नव्या जोडीदारामुळे नवं वळण मिळालं, तर काहींचे जोडीदार अर्ध्यातच संसार सोडून झाले. काही सेलिब्रिटींचे ब्रेकअप झाल्याचंही पाहायला मिळालं. त्यातीलच एक प्रसिद्ध जोडी म्हणजे सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे. जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. पण, अजूनही त्यांच्यातील नाते पूर्ववत होण्याची काही चिन्हं दिसून येत आहेत.

सुशांत-अंकिता कॉफी डेटवर गेल्याचे वृत्त नुकतेच समोर आले आहे. कॉफी हाऊसमध्ये भेटल्यानंतर दोघांनीही एकमेकांशी शांतपणे चर्चा केली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, सुशांत-अंकिताच्या टेबलवर एकदम शुकशुकाट होता. त्यांनी एकमेकांशी कोणताही वाद न घालता शांतपणे चर्चा केली. त्यानंतर ते तेथून निघून गेले. दोघांच्या या भेटीनंतर ते पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा आता मनोरंजन विश्वात सुरु झाली आहे.

गेल्या वर्षी सुशांत-अंकिताच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरु झालेल्या. तेव्हा अंकिताने असं काही नसल्याचं म्हटलं होतं. त्याचवेळी सुशांत आणि ‘राबता’मधील त्याची सहकलाकार असलेली क्रिती सनॉन यांच्या प्रेमसंबंधाच्याही बातम्या येऊ लागल्या होत्या. पण, या दोघांनीही वेळोवेळी त्यांच्या प्रेमसंबंधाचे वृत्त धुडकावून लावले. आता ‘राबता’ चित्रपटाच्या प्रसिद्धीला सुरुवात झाली असून, कार्यक्रमांदरम्यान सुशांत आणि क्रितीमधील जवळीक पाहायला मिळतेय. असे असले तरी, आम्ही केवळ चांगले मित्रमैत्रिण असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
ब्रेकअप झालेल्या जोडप्यांमध्ये गेल्या वर्षी अनुष्का शर्मा – विराट कोहली आणि आलिया भट्ट – सिद्धार्थ मल्होत्रा यांचेही नाव होते. काही दिवस एकमेकांपासून दूर राहिल्यानंर ही जोडपी नंतर पुन्हा एकत्र आली. सोशल मीडियावर व्हायरल झालेले त्यांचे फोटो पाहता या जोडप्यांमधील प्रेम आता पूर्वीपेक्षा अधिक बहरुन आल्याचे दिसते. या जोड्यांप्रमाणेच अंकिता-सुशांतमधील दुरावाही लवकरच दूर होईल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 3:53 pm

Web Title: exflames sushant singh rajput and ankita lokhande go on a coffee date is patch up on the cards
Next Stories
1 जस्टिन बिबर करणार ‘कॉफी विथ करण’च्या नव्या पर्वाची सुरुवात ?
2 पायरसीमुळे ‘बाहुबली २’ला फटका; पोलिसांकडे तक्रार दाखल
3 … या केंद्रीय मंत्र्याच्या मुलीसोबत शाहरुखचं नातं तरी काय?
Just Now!
X