05 April 2020

News Flash

Fact check : लंडनमध्ये कनिकाला भेटल्याने प्रिन्स चार्ल्स यांना करोनाची लागण? जाणून घ्या सत्य

ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनाही करोना व्हायरसची लागण

प्रिन्स चार्ल्स यांची भेट घेतानाचा कनिकाचा फोटो

बॉलिवूड गायिका कनिका कपूरला लंडनहून लखनऊला परतल्यानंतर करोना व्हायरसची लागण झाल्याचं निदान झालं. करोनाची लागण झाल्यानंतरही ती एका डिनर पार्टीलासुद्धा गेली होती. कनिकाच्या संपर्कात आलेल्या २५० ते ३०० जणांचा शोध घेतला गेला आणि त्यातल्या अनेकांची करोना चाचणी करण्यात आली. आता कनिकाचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांची भेट घेतानाचा कनिकाचा हा फोटो आहे. बुधवारी प्रिन्स चार्ल्स यांनाही करोना व्हायरसची लागण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. त्यानंतर सोशल मीडियावर कनिका व प्रिन्स चार्ल्स यांच्या भेटीचा फोटो व्हायरल होऊ लागला. लंडनमध्ये कनिकाने प्रिन्स चार्ल्स यांची भेट घेतली म्हणून त्यांनाही करोना व्हायरसची लागण झाली, असा मेसेज सोशल मीडियावर या फोटोसोबत व्हायरल होऊ लागला. जाणून घेऊयात, यामागचं सत्य..

‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या वृत्तानुसार, कनिकाचा हा फोटो ‘ट्रॅव्हल टू माय एलिफन्ट्स’ या कार्यक्रमातला आहे. प्रिन्स चार्ल्स आणि कॉर्नवॉलच्या डचेस कॅमिला यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मात्र हा कार्यक्रम २०१५ साली पार पडला होता आणि कनिकाचा हा फोटो तेव्हाचाच आहे.

कनिकाने लंडनहून परतल्यानंतर विलगीकरणात राहण्याऐवजी पार्ट्यांना हजेरी लावली. तिच्यामुळे अनेकांना करोना व्हायरसची लागण होण्याचा धोका वाढला होता. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टिकाटिप्पणी झाली होती. सध्या कनिकावर लखनऊमधील रुग्णालयात उपचार सुरू असून तिसऱ्यांदा तिची करोना चाचणी करण्यात आली आणि तिसऱ्यांदा तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 10:11 am

Web Title: fact check did kanika kapoor meet prince charles in london photos go viral as royal tests positive for coronavirus ssv 92
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : लॉकडाउनमध्ये एकटं राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचं काय? दिया मिर्झाने व्यक्त केली चिंता
2 चित्रपट नाटकांचे शीर्षक संदेशरुपातून
3 Video : क्वारंटाइन वेळेत ‘नंदिता वहिनी’ करतेय कधीही न केलेली ही कामं?
Just Now!
X