बॉलिवूडचे शेहेनशाह अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो सध्या प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीला उतरत आहे. हा शो या महिन्याच्या टीआरपी यादीमध्ये टॉप १० शोपैकी एक आहे. नुकताच केबीसी पर्व ११ ला पहिला करोडपती मिळाला. बिहारमध्ये राहणारा सनोज राज असे या करोडपती होणाऱ्या स्पर्धकाचे नाव आहे. तर महिन्याला दीड हजार रुपये कमावणाऱ्या अमरावतीच्या बबिता ताडे या दुसऱ्या करोडपती झाल्या. प्रेक्षकांची शोबाबती उत्सुकता वाढत चालली आहे. चला जाणून घेऊया केबीसी बद्दल काही गोष्टी ज्या तुम्हालाही माहित नसतील.

  • स्पर्धकाच्या संगणावर दाखवण्यात येणारे प्रश्न हे त्याच्या परफॉर्मन्सनुसार बदलले जातात. त्यासाठी बिग बींपासून थोड्या अंतरावर एक तंत्रज्ञ बसवण्यात येतो.
  • अमिताभ यांच्या आरोग्यविषय समस्यांमुळे केबीसी पर्व २ चे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. त्यानंतर केबीसी पर्व ३चे सूत्रसंचालन अभिनेता शाहरुख खान कडे सोपावण्यात आले होते.
  • केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना तीन एलिमेशन राऊंड यशस्वीरित्या पार पाडावे लागतात. यामध्ये पहिला एसएमएस राऊंड असतो, दुसऱ्या राऊंडमध्ये पर्सनल कॉलवर सामान्य ज्ञानाशी संबंधीत प्रश्न विचारण्यात येतो आणि तिसऱ्या राऊंडमध्ये स्पर्धकाचे ऑडिशन घेतले जाते. हे राऊंड स्पर्धकांनी यशस्वीरित्या पार पाडल्यास त्यांना केबीसीमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होता येते.
  • शो दरम्यान अमिताभ यांना त्यांच्या स्वाकक्षरीबद्दल विचारले तर क्रू मेंबर ऑटोग्राफ बुक काढून घेतात आणि पुन्हा परत देत नाहीत.
  • फास्टेस्ट फिंगर फर्स्ट हा राऊंड जिंकल्यानंतर सीन तेथे कट करण्यात येतो. राऊंड जिंकलेल्या स्पर्धकचा मेकअप करुन मग त्याला हॉट सीटवर बसवण्यात येते.
  • १८ वर्षांखालील मुलांना कॅमेराजवळ बसवण्यात येते जेणे करुन ते शॉटमध्ये येणार नाही. हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती १८ वर्षा खालील असेल तरच त्याचावर कॅमेरा मारण्यात येतो.
  • १ कोटी जिंकणाऱ्या स्पर्धकाच्या जिंकलेल्या रक्कमेतून ३०% आयकर कापला जातो. जिंकलेल्या १ कोटींमधून ७० लाख रुपयांची रक्कम स्पर्धकाला मिळते.
  • केबीसीमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांपैकी कोणताही स्पर्धक शो जिंकला किंवा हरला तरी त्याला शो संपेपर्यंत शोच्या सेटवरुन बाहेर जाण्याची परवानगी नसते.
    अमिताभ हे हॉट सीटवर बसण्यापूर्वी प्रत्येक स्पर्धाकबद्दल माहिती करुन घेतात. स्पर्धकाने प्रश्नाचे उत्तर लॉक केल्याशिवाय अमिताभ यांच्या संगणाकावरही प्रश्नाचे योग्य उत्तर दिसत नाही.