News Flash

धक्कादायक! स्टंट दरम्यान उंचीवरुन पडल्यामुळे अभिनेत्याच्या नाकाला दुखापत

सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दाक्षिणात्य अभिनेता फहद फासिलला चित्रपटाच्या सेटवर एका स्टंट दरम्यान गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे. चित्रपटातील एका सीनमध्ये त्याने उंच्चावरुन उडी मारल्याचे दाखवण्यात आले आहे. पण हा सीन शूट करताना फहदच्या नाकाला गंभीर दुखावत झाली. त्यानंतर त्याला डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

फहद हा मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता आहे. तो त्याचा आगामी चित्रपट ‘मलयानकुंजू’चे चित्रीकरण करत होता. दरम्यान एक सीन शूट करत असताना त्याने उंचावरुन उडी मारली आणि त्याच्या नाकाला दुखापत झाली. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून डॉक्टरांनी त्याला विश्रांती करण्यास सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Fahadh Faasil (@fahadhfaassil)

ही घटना कोच्चीमधील पत्थलम स्टुडीओमध्ये घडली आहे. फहद स्टंट करत असताना एका इमारतीच्या छतावरुन दुसऱ्या इमारतीवर उडी मारत होता. दरम्यान त्याला दुखापत झाली आहे. आता चाहते फहद लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. यापूर्वी त्याने ‘सी यू सून’ या चित्रपटात काम केले होते. आता चाहत्यांमध्ये त्याचा आगामी चित्रपट ‘मलयानकुंजू’ बाबत उत्सुकता पाहायला मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 5:16 pm

Web Title: fahadh faasil injured accident while shooting stunt avb 95
Next Stories
1 या व्हिडीओमुळे निया पुन्हा ट्रोल; पाहा व्हिडीओ
2 शुभांगी सदावर्तेचा कायापालट; ‘संगीत देवबाभळी’ ते ‘नवे लक्ष्य’
3 अली फजल आणि रिचा चड्ढा नव्या भूमिकेत एकत्र…
Just Now!
X