26 February 2021

News Flash

दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्राची मुंबई पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता

विशेष पथकाकडून या दोन्ही अभिनेत्रींची चौकशी होण्याची शक्यता

फाइल फोटो

सोशल मिडियावर आपले फॉलोअर्स किती आहेत हे आता अनेकांना खूप महत्वाचं वाटतं. या फॉलोअर्सच्या संख्येवरुन एखाद्या व्यक्तीला महत्व प्राप्त होतं असल्याने आता फॉलोअर्स वाढवण्यासंबंधितील काळाबाजार होऊ लागल्याचा धक्कादायक ट्रेण्ड दिसून येत आहे. अनेक सेलिब्रिटींनाही त्यांच्या फॉलोअर्सची संख्या ही खूप महत्वाची वाटते. जितके अधिक फॉलोअर्स तितकी जास्त किंमत असं गणित या डिजीटल जगातील लोकप्रियतेसाठी मांडलं जातं. मात्र आता या अशा खोट्या फॉलोअर्सवर मुंबई पोलिसांची नजर पडली असून सोशल मिडियावर खोट्या फॉलोअर्ससंदर्भातील तपास पोलिसांनी सुरु केली आहे. हा तपास सुरु झाल्यापासून बरीच माहिती पोलिसांच्या हाती लागली असून. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचच्या या चौकशीमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रासंदर्भात मोठा खुलासा केला आहे. या दोन अभिनेत्रींबरोबरच इतर १० सेलिब्रिटींचे नाव सर्वाधिक फेक फॉलोअर्स असणाऱ्या यादीमध्ये आहे.

फेक फॉलोअर्सला इन्स्ताग्रामच्या भाषेत ‘बोट्स’ असं म्हटलं जातं. याच ‘बोट्स’च्या मदतीने अनेक कलाकार आणि प्रभावशाली व्यक्ती आपल्या फॉलोअर्सची संख्या फुगवून दाखवतात. हे बोट्स विकत घेतलेले असतात. म्हणजेच पैसे देऊन फॉलोअर्सची संख्या वाढवता येते. ही माहिती समोर आल्यानंतर आता या चौकशीचा भाग म्हणून मुंबई पोलीस लवकरच अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणबरोबरच इतर सेलिब्रिटींची चौकशी करणार असल्याचे वृत्त डीएनए या वेबसाईटने दिलं आहे. येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये मुंबई पोलिसांचे विशेष पथक या अभिनेत्रींबरोबरच इतर सेलिब्रिटींची चौकशी करणार असल्याचे या वृत्तामध्ये म्हटलं आहे. खोट्या फॉलोअर्ससंदर्भातील या तपासादरम्यान दीडशे लोकांचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी फेक फॉलोअर्स असणाऱ्या व्यक्तींची यादीच तयार केली आहे. या यादीमध्ये बॉलिवूडमधील सेलिब्रिटींबरोबरच अनेक खेळाडू, बिल्डर आणि हाय प्रोफाइल व्यक्तींची नावं असल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबई पोलीस या चौकशीदरम्यान सेलिब्रिटींकडे त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येसंदर्भात प्रश्न विचारु शकतात. सर्व फॉलोअर्स हे खरे असून फॉलोअर्सचा आकडा फुगवून सांगण्यासाठी कोणत्याही कंपनीची किंवा चुकीच्या पद्धतीचा वापर केला नाही हे सेलिब्रिटींना पोलिसांना पटवून द्यावे लागणार आहे. या फेक फॉलोअर प्रकरणात आतापर्यंत १८ लोकांची चौकशी झाली आहे. पोलिसांनी या व्यक्तींची चौकशी केली आहे ते सर्वजण हे छोट्या पडद्याशी म्हणजेच मालिका आणि टीव्हीवरील मनोरंजन क्षेत्राशी संबंधित आहेत. यामध्ये कलाकारांबरोबरच निर्माते, निर्देशक, मेकअप आर्टीस्ट, कोरियोग्राफर आणि सहाय्यक दिग्दर्शकांचा समावेश आहे. फेक फॉलोअर्स संदंर्भात भारतामध्ये अशाप्रकारे पहिल्यांदाच चौकशी केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 8:14 am

Web Title: fake social media followers scam priyanka chopra deepika padukone likely to be questioned by mumbai police scsg 91
Next Stories
1 ‘प्रवासी रोजगार’! सोनू सूदने स्थलांतरित मजुरांच्या रोजगारासाठी केला अ‍ॅप लाँच
2 आर्थिक परिस्थितीमुळे ‘या’ अभिनेत्रीवर आली राख्या बनवून विकण्याची वेळ
3 सुशांतच्या ‘दिल बेचारा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची वेळ जाहीर
Just Now!
X