अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या कुटुंबात आणि संपूर्ण कलाविश्वात एक प्रकारची पोकळीच निर्माण झाली. त्यांच्या जाण्याने पती बोनी कपूर यांना धक्का बसला होताच. जान्हवी आणि खुशी यांच्या डोक्यावरुनही मायेचं छत्र हरपलं. अशा परिस्थितीत चाहत्यांनी, कपूर कुटुंबियांनी बोनी, जान्हवी आणि खुशी यांना साथ दिली. यामध्ये बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीची मुलंही मागे नव्हती. अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची बहिण अंशुला हे दोघंही आपल्या बहिणींसोबत आणि वडिलांसोबत त्यांचा आधार होऊन उभे राहिले.

दु:खाच्या प्रसंगातही या कुटुंबामध्ये नात्याचे अनोखे बंध पाहायला मिळाले. आता तर अर्जुन त्याच्या सावत्र बहिणींसोबतही चांगलाच रुळत असून, येत्या काही दिवसांमध्ये ही सर्व भावंड लंडनमध्ये सुट्टसाठी जाणार असल्याचं कळत आहे.
‘स्पॉटबॉय ई’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार गेल्या काही दिवसांपासून अर्जुन लंडनमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेला आहे. ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटाच्या निमित्ताने तो तेथे गेला असून, आता त्याच्या बहिणी म्हणजेच अंशुला, जान्हवी आणि खुशीसुद्धा त्याच दिशेने रवाना होणार असल्याचं कळत आहे.

https://www.instagram.com/p/BgjLfErgJ9f/

बोनी कपूर यांच्या मुलांमध्ये खुलणारे हे नात्यांचे बंध बऱ्याच सकारात्मक गोष्टींकडे इशारा करत आहे. काही दिवसांपूर्वी जान्हवीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अंशुला आणि कपूर कुटुंबातील इतर तरुण मंडळींनी जान्हवीसाठी एका खास पार्टीचं आयोजन केलं होतं. दर दिवसाआड अंशुला आणि अर्जुन यांच्यासोबत जान्हवी, खुशीचं नातं आणखी दृढ होताना दिसत आहे. त्यामुळे कलाविश्वातही सध्या या कपूर भावंडांच्याच चर्चा रंगत आहेत.

वाचा : मित्राच्या ‘त्या’ एका वाक्यामुळे सचिन मुंबईच्या रस्त्यावर खेळला क्रिकेट

https://www.instagram.com/p/Bf_vaEwFGmV/