अभिनेता मनोज वाजपेयीची तुफान गाजलेली वेब सीरिज म्हणजे ‘ द फॅमेली मॅन’. या सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या मनोज वाजपेयीने प्रत्येकाच्या मनात एक खास जागा निर्माण केली. त्यामुळेच एका मध्यमवर्गीय व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित असलेली ही सीरिज प्रचंड गाजली. विशेष म्हणजे या सीरिजचा पहिला भाग गाजल्यानंतर त्याच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. कारण या ‘द फॅमेली मॅन 2’ च्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘द फॅमेली मॅन 2’ या सीरिजचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली होती. त्यातच आता अॅमेझॉनने इन्स्टाग्रामवर या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. एका प्रोमोच्या माध्यमातून ही जाहीर सांगण्यात आली आहे.
View this post on Instagram
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ठरलेली ‘द फॅमेली मॅन 2’ ही सीरिज १२ फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘श्रीकांत मिशनच्या मागे आणि खलनायक श्रीकांतच्या मागे..चलो शुरु हो जाओ’, असं कॅप्शन प्रोमो व्हिडीओ शेअर करताना दिलं आहे.
दरम्यान, प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये मनोज वाजपेयी दिसून येत आहे. या सीरिजमध्ये मनोज वाजपेयीसोबत समंथा अक्किनेनी, प्रियामणि, शारिब हाशमी, सीमा बिस्वा, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर हे महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 7, 2021 4:01 pm