25 March 2019

News Flash

या दिवशी, या वेळी पाहता येणार ‘फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा’

काही दिवसांपूर्वीच कपिलच्या या शोचा टीझर प्रदर्शित करण्यात आला.

कपिल शर्मा

विनोदवीर कपिल शर्मा भल्या मोठ्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. २०१७ या वर्षी बऱ्याच अडचणी आणि अपयशाचा सामना केल्यानंतर आता कपिल एका नव्या कोऱ्या शोच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर परतणार आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी कपिल पुन्हा नव्या अंदाजात तयार झाला आहे. सोनी वाहिनीवरुनच तो ‘फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा’ या शोच्या माध्यमातून परतण्याच्या तयारीत असून, २५ मार्चला या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. ‘सुपर डांसर चॅप्टर २’ या कार्यक्रमाऐवजी कपिलची ही हास्यमय मेजवानी अनुभवता येणार आहे.

काही दिवसांपूर्वीच कपिलच्या या शोचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. ज्यामध्ये त्याचा कार्यक्रम नेमका कसा असेल याचा अंदाज लावता येणं सहज शक्य झालं. ‘एक नया ट्विस्ट, एक नया सफर… पर वही कपिल शर्मा’, अशा कॅप्शनसह सोनी वाहिनीच्या ट्विटर अकाऊंटवरुन हा टीझर पोस्ट करण्यात आला होता. हा टीझर आणि कपिलच्या शोमध्ये असणारी कलाकारांची फौज पाहता प्रेक्षकही त्यांच्या कार्यक्रमासाठी प्रचंड उत्सुकता दाखवत असल्याचं पाहायला मिळत आहे. चंदन प्रभाकर आणि किकू शारदा यांची साथ कपिलला लाभली असली तरीही सुनील ग्रोवर मात्र त्याच्या कार्यक्रमात झळकणार नाहीये.

कपिलच्या शोचा टीझर पाहता त्याच्या खऱ्या आयुष्यापासूनच प्रेरणा घेत विनोदी पद्धतीने या टीझरची मांडणी केल्याचं लक्षात येत आहे. सहकाऱ्यांशी झालेला वाद, त्यानंतर कार्यक्रमाकडे सेलिब्रिटींचं पाठ फिरवून जाणं आणि बॉलिवूड चित्रपटाच्या वाटयाला अपयश येणं या सर्व गोष्टींतील अंश घेत कपिल कशा प्रकारे नव्या उमेदीने आणि नव्या संकल्पनेसह छोट्या पडदयावर परतत आहे, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा’चा टीझर.

View this post on Instagram

need ur best wishes 🙂 coming soon 🙏

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

First Published on March 8, 2018 6:01 pm

Web Title: family time with kapil sharma comedy show to go on air from march 25 will replace super dancer 2 television