News Flash

‘कार्तिक’ योग!

कार्तिकने आत्तापर्यंत खूप सुपरहिट चित्रपट दिलेत असं नाही, पण तरीही तो लोकप्रिय आहे यात शंका नाही.

एखाद्या कलाकाराची अचानक हवा होणं आणि काही काळाने त्याचं धाडकन आपटणं किं वा हळूहळू विस्मृतीत जाणं या गोष्टी बॉलीवूडला तशा नव्या नाहीत. तरीही एखादा नवोदित किंवा फारसा परिचयाचा नसलेला चेहरा अचानक चर्चेत येतो तेव्हा त्याच्याबद्दल वावड्याही उठतातच. कार्तिक आर्यन हे अशा सध्या चर्चेत असलेल्या कलाकारांपैकी एक नाव आहे. एखादा कलाकार लोकप्रिय झाला तर तो बॉलीवूडच्या यशराज किंवा धर्मा प्रॉडक्शनसारख्या मोठमोठ्या निर्मितीसंस्थांच्या चित्रपटात दिसणं हेही आता सहजी दिसू लागलं आहे. वरवर सगळं आलबेल चाललं आहे असं वाटत असतानाच काही गोष्टी लागोपाठ कानावर येत राहतात आणि मग हा निव्वळ योगायोग की खरंच काही घडून गेलं आहे?, यावर चर्चा झडत राहतात. सध्या अशाच ‘कार्तिक’ योगायोगाची चर्चा सुरू आहे.

कार्तिकने आत्तापर्यंत खूप सुपरहिट चित्रपट दिलेत असं नाही, पण तरीही तो लोकप्रिय आहे यात शंका नाही. ‘प्यार का पंचनामा’च्या वेळी त्याच्याबद्दल फारशी चर्चा नव्हती. ‘सोनू के  टिटू की स्वीटी’ या चित्रपटानंतर कार्तिक आणि क्रिती सनन जोडीचा ‘लुकाछुप्पी’, ‘लव्ह आज कल’, ‘पती पत्नी और वो’ असे त्याचे चित्रपट आले. ‘लव्ह आज कल’च्या निमित्ताने कार्तिक आणि सारा अली खान यांच्या प्रेमसंबंधांच्या चर्चा रंगल्या आणि तो अधिकच लोकप्रिय झाला. अर्थात त्याच्याकडे सध्या चांगले चित्रपटही आहेत. ज्यात ‘भूलभुलैया २’चा आणि ‘दोस्ताना २’चा उल्लेख करावा लागेल. त्यापैकी एक चित्रपट अजूनही तो करतो आहे आणि दुसऱ्या चित्रपटातून तो बाहेर पडला आहे किं वा त्याला बाहेर काढलं आहे. यातलं नेमकं  सत्य काय ते खुद्द कार्तिक आणि चित्रपटाचा निर्माता करण जोहर दोघंच जाणोत… पण हे गूढ काय आहे ते उकलण्याआधी आणखी एक घटना गेल्या आठवड्यात घडली.

कार्तिकचा ‘धमाका’ हा चित्रपट नेटफ्लिक्सने १३५ कोटी रुपये मोजून विकत घेतल्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या. सध्या ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या अनेक हिंदी चित्रपटांपैकी या चित्रपटाला मिळालेली ही किंमत खूपच मोठी आहे. आणि त्यामुळेच की काय कार्तिकसाठी १३५ कोटी रुपये मोजणं खरंच शक्य आहे का?, याचाही शोध घ्यायला अनेकांनी सुरुवात के ली. ‘धमाका’ हा चित्रपट अवघ्या दहा दिवसांत चित्रित झाला असल्याचे सांगितले जाते. राम मधवानी दिग्दर्शित ‘धमाका’ हा कोरियन चित्रपट ‘द टेरर लाइव्ह’चा अधिकृत रिमेक आहे. ३० कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट पोस्ट प्रॉडक्शन पूर्ण झाल्यानंतर थेट नेटफ्लिक्सवर झळकणार आहे. अर्थात, १३५ कोटींची बातमी जनसंपर्क अधिकाऱ्यांकडूनच आली असली तरी हे पिल्लू कोणी सोडले हे गुलदस्त्यात आहे. नेटफ्लिक्सने मात्र १३५ कोटींचा आकडा चुकीचा असल्याचे सांगितले आहे. हा ‘धमाका’भरा गोंधळ वाढतो आहे तोवर करण जोहरने ‘दोस्ताना २’मधून कार्तिकची हकालपट्टी के ली असल्याचे जाहीर निवेदन दिले आहे. ‘दोस्ताना २’चे चित्रीकरण पूर्ण होत आले असतानाच तो आपल्याला पटलेला नसल्याने पुन्हा चित्रित के ला जावा, अशी मागणी कार्तिकने के ल्याचे धर्मा प्रॉडक्शनने जाहीर के लेल्या निवेदनात म्हटले आहे. कार्तिकने या चित्रपटाच्या करारावर सह्या करण्याआधीच पूर्ण पटकथा वाचली होती. त्यानंतरच त्याने होकार दिला होता, आता चित्रीकरण झाल्यानंतर बदल करण्याचा अव्यावसायिकपणा तो कसा दाखवू शकतो?, असा सवाल प्रॉडक्शनने उपस्थित के ला आहे. याच कारणामुळे २० कोटींचे नुकसान सहन करूनही कार्तिक आर्यनच्या जागी दुसऱ्या कलाकाराला घेऊन पुन्हा चित्रीकरण करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. कार्तिकबाबत लागोपाठ घडलेल्या या दोन्ही घटना निव्वळ योगायोग म्हणाव्यात की खरोखरच कु ठेतरी काहीतरी बिघडले आहे ते लवकरच कळेल. मात्र सध्या या स्टार कलाकाराच्या लोकप्रियतेला ग्रहण लागले आहे यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2021 12:10 am

Web Title: famous actor bollywood karthik aryan akp 94
Next Stories
1 कंगनाने केली पाकिस्तानची स्तुती, ट्वीट व्हायरल
2 “पंतप्रधान हे देशासाठी पित्यासमान आहेत”, कंगना रणौतने केलं ट्वीट
3 “…म्हणून मी अजूनही सिंगल आहे”, कंगनाने केला खुलासा
Just Now!
X