जुन्या पिढीतल्या प्रसिद्ध अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक यांचे शनिवारी संध्याकाळी मुंबईत निधन झाले. १९७३ मधील ‘गरम हवा’ या चित्रपटातील त्यांच्या भुमिकेचे कौतुक झाले होते. राष्ट्रीय एकात्मतेवर आधारीत असलेल्या या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला होता. टीव्ही क्षेत्रातील निवेदक-निर्माते आणि माहितीपट निर्माते सिद्धार्थ काक हे त्यांचे पती होत.

सन १९७२ मध्ये आलेल्या गुलझार यांच्या ‘परिचय’ या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. यामध्ये जितेंद्र आणि जया भादुरी हे मुख्य भुमिकेत होते. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात त्या प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या. या काळात त्यांनी शोले, त्रिशूल, डिस्को डान्सर, राम तेरी गंगा मैली, नूरी, देश प्रेमी, डान्स डान्स, कसम पैदा करने वाले की, शौकीन, अर्थ, एक चादर मिली सी, गमन आणि दुसरा आदमी या चित्रपटांमधून भुमिका साकारल्या.

Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
lokrang, article, pandit kumar gandharv, singing style, thoughts, indian classical music, book, about to launch, gandharvanche dene pandit kumarjinshi sanvad,
कुमारजींचा सांगीतिक विचार
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

गीता काक यांचे पती सिद्धार्थ काक यांचा १९९० ते २००१ या काळात दुरदर्शनवरुन प्रसारित होणारा सुरभी हा कार्यक्रम खूपच प्रसिद्ध झाला होता. या कार्यक्रमासाठी गीता काक यांनी कलादिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते. गीता आणि सिद्धार्थ काक यांची मुलगी अंतरा ही डॉक्युमेंट्री फिल्म मेकर आहे. आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीव्यतिरिक्त गीता काक या सामाजिक कार्यासाठी देखील ओळखल्या जात होत्या.