News Flash

वयाच्या ५०व्या वर्षी ही मॉडेल झाली आई

फॅशन डिझायनर डायान वॉन फर्स्टनबर्ग सोबत चर्चेत असताना नाओमीने याविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

ब्रिटीश सुपरमॉडेल नाओमी कॅम्पबेलचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. आता नाओमीने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. त्याबद्दल तिने अधिक माहिती एका मुलाखतीत दिली आहे. नाओमीने वयाच्या ५० व्या वर्षी एका मुलीला जन्म दिला आहे.

‘नो फिल्टर्स विथ नाओमी’ या कार्यक्रमात फॅशन डिझायनर डायान वॉन फर्स्टनबर्गने हजेरी लावली होती. त्यावेळी त्या दोघांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. त्यावेळी नाओमीसाठी लॉकडाउनचा काळ कसा होता हे तिने सांगितले. “लॉकडाउनचा काळ माझ्यासाठी खूप सुंदर होता आणि लॉकडाउनमध्ये मी एका मुलीला जन्म दिला,”असे नाओमी म्हणाली. डियान वॉन यांनी लगेच यावर नाओमीला प्रश्न विचारला, “आई होण्याचा निर्णय कसा घेतला?” या प्रश्ननावर उत्तर देतं नाओमी म्हणाली, “३० वर्षांची होई पर्यंत काय करावे हे मला समजलेच नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Naomi Campbell (@naomi)

नाओमीने या मुलाखतीत मुलीला जन्म कधी दिला हा खुलासा केला नाही. मात्र, एवढं सांगितलं की मुलीचा जन्म हा करोना व्हायरसमुळे लागु करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Naomi Campbell (@naomi)

आणखी वाचा : खुद्द आदित्य नारायणनेच केला इंडियन आयडलचा पर्दाफाश

नाओमीने पुढे सांगितले की, “सुरुवातीला तिने अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला होता, परंतु नंतर तिने आयव्हीएफद्वारे आई होण्याचे ठरवले. आई झाल्यानंतर नाओमीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक फोटो शेअर करत तिच्या मुलीचा एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोवर कमेंट करत सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी नाओमीला शुभेच्छा दिल्या होत्या.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 11:16 am

Web Title: famous model naomi campbell became mother at the age of 50 through ivf dcp 98
Next Stories
1 कोरिओग्राफर गीताने केले लग्न? व्हायरल झालेला फोटो पाहून म्हणाली..
2 ‘रणबीर, करिश्मा आणि करीना घराणेशाहीमुळे नाही तर…’, रिद्धिमा कपूरचा खुलासा
3 हुश्श! ‘द फॅमिली मॅन २’चा ट्रेलर अखेर प्रदर्शित; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X