रिअॅलिटी टीव्ही स्टार अमांडा स्टॅनटनला पोलिसांनी अटक केली आहे. अमांडा गेल्या सोमवारी एका हॉटेलमध्ये पार्टी करत होती. यावेळी अचानक पोलीस तिच्या रुममध्ये दाखल झाले आणि तिला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, पाच फूट तीन इंच उंची असणाऱ्या अमांडावर आपल्या साडे सहा फूट उंच बॉयफ्रेंडला धक्का दिल्याचा आरोप आहे. अमांडाचा बॉयफ्रेंड बॉबीने सुरक्षारक्षकांकडे आपल्या गर्लफ्रेंडने जोरात धक्का दिल्याची तक्रार केली. यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावलं.
ज्यावेळी घटना घडली तेव्हा अमांडाने खूप मद्यपान केलं होतं असं सांगितलं जात आहे. दारुच्या नशेतच तिने आपल्या बॉयफ्रेंडला जोरात धक्का दिला होता. यावेळी तिथे गोंधळ उडाल्यानंतर सुरक्षारक्षकांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी घरगुती हिंसाचार प्रकरणी अमांडाला अटक केली.
पोलिसांनी नंतर अमांडाची सुटका केली. विशेष म्हणजे यानंतरही अमांडा आणि तिचा बॉयफ्रेंड एकत्र राहत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, पार्टीत कोणीतरी दारुत काहीतरी मिसळलं होतं, ज्यामुळे अमांडाची शुद्ध हरपली होती. गेल्या मंगळवारी अमांडाने इन्स्टाग्रामवर आपल्या बॉयफ्रेंडचे फोटोही शेअर केले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 13, 2018 2:20 pm