News Flash

माहेरी रंगणार वहिनींच्या खेळाचा डाव; ‘होम मिनिस्टर सन्मान माहेरवाशिणीचा’ लवकरच

'या' दिवशी रंगणार होम मिनिस्टरचा नवा भाग

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे होम मिनिस्टर. गेले १६ वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. रोजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनातून महिलांना थोडीशी उसंत मिळावी. त्यांचं मनोरंजन व्हावं यासाठी हा कार्यक्रम सुरु करण्यात आला. विशेष म्हणजे १६ वर्षांपासून सुरु असलेल्या या कार्यक्रमाची लोकप्रियता तसूभरदेखील कमी झालेली नाही. त्यातच या कार्यक्रमात वेगवेगळे डाव रंगत असतात. आता लवकरच या कार्यक्रमात एक नवीन पर्व रंगणार आहे.

लॉकडाउनच्या काळातही आदेश बांदेकर यांनी ऑनलाइन माध्यमातून प्रत्येक गृहिणीची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मात्र, आता या कार्यक्रमात नवीन पर्व पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत वहिनींच्या घरी जाऊन त्यांची भेट घेणारे आदेश बांदेकर आता वहिनींच्या माहेरी जाणार आहेत.

वाचा : ‘ती’ माझी मोठी चूक होती; मायकल जॅक्सन लूकमध्ये बिग बींनी शेअर केला फोटो

या नवीन पर्वात आदेश भावजीवहिनींच्या माहेरी जाऊन तिकडे पैठणीचा खेळ खेळतील, माहेरी जाऊन वाहिनीच्या लहानपणीच्या गमती जमती, लग्नाआधी कुटुंबासोबत असलेले भावनिक ऋणानुबंध, यांनाउजाळा देतील. दरम्यान, या नव्या पर्वाच्या निमित्ताने आदेश बांदेकर आणि दिग्दर्शक महेश कदम ही जोडी बऱ्याच वर्षानंतर एकत्र काम करणार आहेत. हे नवं पर्व येत्या ४ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 1:09 pm

Web Title: famous tv show home minister adesh bandekar ssj 93
Next Stories
1 ‘मेरी राख को गंगा मे मत बहाना’; कंगना रणौतची कविता
2 ‘ती’ माझी मोठी चूक होती; मायकल जॅक्सन लूकमध्ये बिग बींनी शेअर केला फोटो
3 रणथंबोरमध्ये आलिया-रणबीर करणार गुपचूप साखरपुडा?
Just Now!
X