News Flash

काजोलने नंबर दिला पण…

काजोलने इन्स्टाग्रामद्वारे चाहत्यांशी संवाद साधताना हा नंबर दिला आहे

आजकाल बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर सतत सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. कधी कधी बॉलिवूड कलाकार सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संवाद देखील साधतात. नुकताच अभिनेत्री काजोलने देखील चाहत्यांशी संवाद साधला आहे. चाहत्यांनी ही संधी न दवडता काजोलला अनेक प्रश्न विचारले आहेत. त्यात एका चाहत्याने चक्क तिचा मोबाईल नंबरही मागितला आहे. मात्र त्यावर काजोलने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

काजोलने इन्स्टाग्रामवरील प्रश्न आणि उत्तर या फिचरद्वारे चाहत्यांशी संवाद साधला आहे. दरम्यान एका चाहत्याने तिचा मोबाईल नंबर मागितला होता. त्यावर काजोलने दिलेले उत्तर पाहून तुम्हाला ही हसू येईल. तिने त्या चाहत्याला उत्तर देत चक्क ‘100 हा माझा नंबर आहे. मला केव्हाही कॉल कर’ असे म्हटले आहे. १०० हा पोलिसांचा क्रमांक आहे. काजोलने दिलेल्या उत्तराची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

एका चाहत्याने काजोलला जर तिच्या आयुष्यात अजय देवगण नसता तर तिने शाहरुख खानशी लग्न केले असते का? असा प्रश्न विचारला. ‘पुरुषाने प्रपोज करायचं असतं ना’ असे उत्तर त्यावर तिने दिले. त्यानंतर एका चाहत्याने शाहरुख आणि तू पुन्हा एकत्र कधी दिसणार असा प्रश्न देखील विचारला.

आणखी वाचा : “…तर शाहरुखशी केलं असतं का लग्न?”; काजोलने दिले भन्नाट उत्तर

सध्या काजोल तिचा आगामी चित्रपट ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार असून तो तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. तर काजोल तान्हाजी यांची पत्नी सावित्रीबाई मालुसरे यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2019 8:45 am

Web Title: fan asks kajol for her phone number she gave funny reply avb 95
Next Stories
1 सलमानला ‘लवयात्री’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
2 संजय लीला भन्साळी चित्रपट बनवत असणाऱ्या गंगुबाई आहेत तरी कोण?
3 दबंग सलमानने दुखावल्या हिंदूंच्या भावना?, नेटकऱ्यांमध्ये जुंपली
Just Now!
X