डोक्यावर छप्पर नसताना, कुणाचाही आधार नसताना केवळ सुरेल आवाजाच्या जोरावर सोशल मीडियाद्वारे रोतोरात स्टार झालेल्या रानू मंडल यांची आज देशभरात जोरदार चर्चा सुरु आहे. कोलकातामधील एका रेल्वे स्टेशनवर गाणे गाताना रानू यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि त्यांना एक वेगळी ओळख मिळाली. तो व्हिडीओ पाहून अभिनेता आणि गायक हिमेश रेशमियाने त्याच्या आगमी चित्रपटात रानू यांना गाणे गाण्याची संधी दिली आणि रानू यांचे पूर्ण आयुष्य बदलले. मात्र रानू यांचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन त्यांना लोकप्रियता मिळताच वागणे बदलले असल्याचे म्हटले जात आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये रानू मंडल एका दुकानात खरेदी करताना दिसत आहेत. दरम्यान तेथे उपस्थित असलेल्या एका महिलेने रानू मंडल यांच्या हाताता स्पर्श करत सेल्फीसाठी विनंती केली होती. त्या महिलेने हाताला स्पर्श करणे रानू यांना आवडले नाही. ‘असा हाताला स्पर्श करुन आवाज का देता? काय आहे हे?’ असे म्हणत रानू यांनी त्या महिलेला सुनावले आहे. रानू यांचे वेगळे वागणे पाहून महिला त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत राहिली.

आणखी वाचा : बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री लवकरच चढणार बोहल्यावर

रानू मंडल यांचा रेल्वे स्थानकांमध्ये गाणे गाण्यापासून ते बॉलिवूडमधील एक लोकप्रिय गायिका हा जीवनप्रवास अतिशय खडतर होता. त्यांचा हा जीवनप्रवास ऐकून प्रेरीत झालेल्या चित्रपट निर्माता ऋषिकेश मंडलनेने रानू यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.