07 March 2021

News Flash

जुलैपासून बेपत्ता असलेल्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रीला ९५१ कोटींचा दंड

कर बुडवल्याप्रकरणी तिला दंड ठोठावण्यात आला आहे. ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे.

३६ वर्षांची फॅन ही अनेक प्रतिष्ठित ब्रँडची सदिच्च्छा दूत आहे. तसेच जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत ती अव्वल आहे.

चीनमधल्या प्रत्येक सिनेरसिकांच्या हृदयात फॅन बिंगबिंग हे नाव कोरलं आहे. चीनमधली ती सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. १५ वर्षांहून अधिक काळ ती चिनी प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे. याच लोकप्रिय अभिनेत्रीला कर बुडवल्याप्रकरणी ९५१ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. फॅन ही जुलै महिन्यापासून बेपत्ता आहे.

तिची लोकप्रियता फक्त चीनपुरताच मर्यादित नसून हॉलिवूडमध्येही ती तितकीच लोकप्रिय आहे. तिच्यावर आणि तिच्या कंपनीवर कर बुडवल्याचा आरोप आहे. फॅननं तिचं खरं उत्पन्न लपवून ठेवलं आणि कर चुकवण्यासाठी कमी उत्पन्न दाखवलं असा तिच्यावर आरोप आहे. तिच्या एजंटला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. यासाठी तिला ९५१ कोटींचा सर्वाधिक दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड तिनं दिलेल्या मुदतीत न भरल्यास तिला तुरूंगवासही होऊ शकतो. गेल्या कित्येक महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या फॅननं अखेर सोशल मीडियावर माफीनामा लिहिला आहे.

‘मी गेल्या काही महिन्यांपासून तीव्र वेदनेतून जात आहे. माझ्याकडून काही चुका झाल्यात त्याबद्दल मी माफी मागते. कायद्यानं जो निर्यण दिला आहे तो मला मान्य आहे. मी लवकरच कर आणि दंडाची रक्कम चुकती करेन. तुमच्या प्रेम आणि विश्वासाशिवाय फॅनचं अस्तित्त्व नाही’ असं म्हणत तिनं माफी मागितली आहे. ३६ वर्षांची फॅन ही अनेक प्रतिष्ठित ब्रँडची सदिच्च्छा दूत आहे. तसेच जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत ती अव्वल आहे. मात्र जुलै महिन्यापासून ती कुठे आहे हे याची कल्पना कोणालाच नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2018 2:16 pm

Web Title: fan bingbing has been fined around 883 million yuan for tax evasion
Next Stories
1 Video : तुम्ही ऑनलाइन फूड ऑर्डर करता? मग डिलिव्हरी बॉयचा हा प्रताप पाहाच
2 सुजुकीने भारतात लॉन्च केल्या दोन नव्या Off Road बाइक्स, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
3 दारुबंदी असलेल्या बिहारमध्ये उंदरांनी फस्त केले बियरचे 200 कॅन !
Just Now!
X