26 February 2021

News Flash

सलमा खान- कतरिना कैफला नेटकऱ्यांनी म्हटलं ‘सासू- सून’; पाहा सलमानची बहीण अर्पिताची प्रतिक्रिया

माल्टामधील सलमा खान आणि कतरिनाचा फोटो सोशल मीडियावर ठरतोय चर्चेचा विषय

सलमान खानची आई सलमा खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ

ऐतिहासिक स्थळांसाठी ओळखला जाणाऱ्या माल्टा इथं सलमान खानच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. या सेटवरील बरेच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सलमान आणि कतरिनाच्या फोटोने ईदच्या दिवशी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता सलमानची आई सलमा यांच्यासोबतचा कतरिनाचा फोटो पाहायला मिळत आहे.

सलमानची बहीण अर्पिताने हा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सलमा खान वधूच्या वेशात असलेल्या कतरिनाला प्रेमाने आलिंगन देताना दिसत आहेत. हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या असून अनेकांनी त्यांना ‘सासू- सुनेची जोडी’ असं म्हटलं आहे. सलमान आणि कतरिनाच्या रिलेशनशिपच्या चर्चा पाहता नेटकऱ्यांनी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

salma khan and katrina kaif सलमान खानची आई सलमा खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ

स्वत: अर्पिताने यातल्या एका कमेंटवर काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहा..

वाचा : आर. के. स्टुडिओच्या लोगोमागची रंजक कथा तुम्हाला माहित आहे का?

काही वेळाने अर्पिताने हा फोटो डिलीट केला पण तोपर्यंत तो व्हायरल झाला होता. माल्टा येथे सलमानसोबत आई सलमा खान आणि बहीण अलविरा खान दोघीही गेल्या आहेत. आईसोबतचे अनेक व्हिडिओ सलमानने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत.
‘भारत’ या चित्रपटात सलमान आणि कतरिनासोबत दिशा पटानी, तब्बू, नोरा फतेही यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 1:30 pm

Web Title: fan calls katrina kaif salma khan saas bahu here is how salman khan sister arpita khan reacted
Next Stories
1 Gold box office collection : अक्षयच्या ‘गोल्ड’ला १०० कोटींचं सुवर्ण यश
2 ‘लव सोनिया’साठी सई पुन्हा झाली ‘वजनदार’
3 Kasautii Zindagii Kay 2: शाहरुखने एका मिनिटासाठी घेतलं तब्बल इतकं मानधन
Just Now!
X