News Flash

‘जय माता दी’मधून श्रिया- सुप्रिया एकत्र

स्वत:चं अभिनय कौशल्य खुलवण्याचा ती प्रयत्न करत आहे

श्रिया पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर

कलाकारांची मुलं चित्रपटसृष्टीत पदार्पण करतात तेव्हा त्यांच्याकडून प्रेक्षकांच्या बऱ्याच अपेक्षा असतात. मराठी चित्रपटसृष्टीतील अशाच एका सेलिब्रिटीची मुलगी या चित्रपटसृष्टीत स्वत:ची अशी ओळख बनवू पाहात आहे. किंबहुना त्यात तिला यशही मिळालं आहे. ती मुलगी म्हणजे श्रिया पिळगावकर. ‘फॅन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी श्रिया लवकरच तिच्या आईसोबत म्हणजेच अभिनेत्री सुप्रिया पिळगावकरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. मातृदिनाच्या निमित्ताने श्रिया-सुप्रिया एका लघुपटासाठी एकत्र आल्या असून, ‘जय माता दी’ असं या विनोदी लघुपटाचं नाव आहे.

‘टेरिबली टायनी टॉकिज’ या युटयूब चॅनलवर शनिवारी म्हणजे १३ मे रोजी हा लघुपट प्रदर्शित केला जाणार आहे. नवजोत गुलाटी दिग्दर्शित आणि लिखित या लघुपटामध्ये अभिनेता शिव पंडीतही झळकणार आहे. सुप्रिया आणि श्रिया या लघुपटाबद्दल फारच उत्सुक आहेत.

‘श्रिया आणि मी याआधीही स्क्रिन शेअर केली आहे. पण, यावेळी आम्ही खऱ्या अर्थाने एकमेकींसोबत काम केलं. तिच्या अभिनय कौशल्यामध्ये नैसर्गिक भाव असून, ज्या पद्धतीने ती स्वत:चं अभिनय कौशल्य खुलवण्याचा प्रयत्न करत आहे ही खरंच कौतुकाची बाब आहे. ‘जय माता दी’मध्ये आम्ही एक धमाल नातं साकारत आहोत जे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असं सुप्रिया पिळगावकर म्हणाल्या. तर, आईसोबत काम केल्याच्या अनुभवाविषयी सांगताना श्रिया म्हणाली, ‘माझ्यासाठी हा एक महत्त्वाचा लघुपट आहे. कारण आईसोबत काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. त्यातही माझ्या वाढदिवसाच्याच दिवशी या लघुपटाचं चित्रीकरण झाल्यामुळे तो माझ्या हृदयाच्या आणखीनच जवळचा आहे. ती (आई) सर्वतोपरी एक उत्तम स्त्री आणि अभिनेत्री आहे. तिच्यासोबत काम करण्याचा अनुभव फारच वेगळा आणि आनंददायी होता.’

श्रियाचं फॅन फॉलोविंग दिवसेंदिवस वाढत आहे. शाहरुख खानची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘फॅन’ या चित्रपटातून झळकल्यानंतर श्रिया प्रकाशझोतात आली. याआधी तिने आपल्या वडिलांची म्हणजेच सचिन पिळगावकर यांची निर्मिती असलेल्या ‘एकुलती एक’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं.

fan-stills-759-1

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2017 6:55 pm

Web Title: fan girl actor shriya pilgaonkar to star with mother supriya pilgaonkar in a short film for mothers day
Next Stories
1 बॉक्स ऑफीसवर ‘बेवॉच’, ‘वंडर वुमन’ आमने-सामने
2 VIDEO: राज कपूर आणि त्यांच्या नातवंडांमधला एक संवाद असाही…
3 Video : नव्या नंदा अशाही रुपात…
Just Now!
X