News Flash

“… तर मी आत्महत्या करेन”; चाहत्याची शाहरुखला धमकी

SRK ANNOUNCE YOUR NEXT

अभिनेता शाहरुख खान बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखला जातो. त्याने आपल्या अनोख्या अभिनय शैलीच्या जोरावर एक काळ गाजवला आहे. मात्र गेल्या काही वर्षात इतर अभिनेत्यांच्या तुलनेत शाहरुखची काहीशी पिछेहाट झालेली दिसते. गेला काही काळ शाहरुखसाठी फारसा चांगला गेलेला नाही. कधीकाळी एकामागून एक सुपरहिट चित्रपट देणारा शाहरुख आज एका हिट चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहे.

मात्र त्याची ही प्रतिक्षा चाहत्यांना फारशी रुचलेली नाही. चाहत्यांनी सोशल मीडियावरुन शाहरुखकडे नव्या चित्रपटाची मागणी सुरु केली आहे. ‘SRK ANNOUNCE YOUR NEXT’ असा स्टेटस असलेल्या पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. एका चाहत्याने तर “तु आत्ताच्या आत्ता नव्या चित्रपटाची घोषणा कर अन्यथा मी आत्महत्या करेन” अशा आशयाचे ट्विट केले आहे.

काय म्हणतायेत इतर नेटकरी?

शाहरुखने २०१८ साली ‘झिरो’ या चित्रपटात काम केले होते. परंतु हा चित्रपट तिकीटबारीवर देखील झिरोच ठरला होता. या चित्रपटामुळे शाहरुखची प्रचंड खिल्ली उडवण्यात आली होती. परिणामी २०१९ या वर्षात त्याने एकाही चित्रपटात काम केले नाही. मात्र त्याचे चाहते मात्र त्याचा नवा चित्रपट पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 4:18 pm

Web Title: fan threatens suicide if shah rukh khan doesnt announce his next film mppg 94
Next Stories
1 प्रिती झिंटाने दिल्या नववर्षाच्या शुभेच्या; व्हिडीओ व्हायरल
2 अभिनेत्रींनी स्वीमसूटमध्ये दिली ‘नागिन ५’साठी ऑडिशन; व्हिडीओ व्हायरल
3 विद्याच्या साडीचे किस्से; अशी लढवली शक्कल की नातेवाईकही होतात खूश
Just Now!
X