गर्लफ्रेंड नताशा दलाल हिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका चाहतीविरोधात अभिनेता वरुण धवनने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ही चाहती वरुणची भेट घेण्यासाठी त्याच्या घराबाहेर थांबली होती. पण बराच वेळ होऊनही वरुण न भेटल्याने तिला घराबाहेर राडा घातला.
‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, वरुणची संबंधित चाहती बऱ्याच वेळा त्याच्या घराबाहेर उभी असल्याचं पाहिलं गेलं. वरुणला जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा तो चाहत्यांची भेट घेतो आणि त्यांच्यासोबत सेल्फीसुद्धा काढतो. पण त्यादिवशी वरुण वर्कआऊट करून घरी परतला होता. तो खूपच थकलेला असल्याने त्याने चाहतीची भेट घेतली नाही. सुरक्षारक्षकांनी तिला जाण्यास सांगितले असतानाही ती तिथे बराच वेळ उभी राहिली. सुरुवातीला तिने स्वत:ला मारुन घेण्याची धमकी दिली. पण त्यानंतरही वरुण बाहेर न आल्याने तिने त्याच्या गर्लफ्रेंडला जीवे मारण्याची धमकी दिली. चाहतीने धमकी दिल्यानंतर वरुणने पोलिसांत तक्रार दाखल केली. यासंदर्भात अद्याप त्याने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
वरुणचा आगामी ‘कलंक’ हा चित्रपट येत्या १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये त्याच्यासोबत आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, माधुरी दीक्षित, आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 7, 2019 1:32 pm