2014 सालात प्रदर्शित झालेला नागराज मंजुळेंचा फँड्री सिनेमा तुफान गाजला. या सिनेमाने दोन राष्ट्रीय पुरस्करांसह अन्य 26 पुरस्कार पटकावले आहेत.या सिनेमातील जब्या आणि शालूच्या जोडीनं प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘फँड्री’ सिनेमातील शालू पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर शालूने तिच्या अदांनी अनेकांना घायाळ केलं आहे.
‘फँड्री’ सिनेमात शालूची भूमिका साकरणाऱ्या राजेश्वरी खरातने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजेश्वरी सोशल मीडियावर भन्नाट फोटो आणि व्हिडीओ शेअर करतेय. राजेश्वरीच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांची मोठी पसंती मिळतेय.
नुकाताच राजेश्वरीने एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यात व्हिडीओत ती मोठ्या थाटात चालताना दिसतेय.”तुम्हाला जर गरुडासोबत उंच झेप घ्यायची असले तर तुम्हाला बदकांसोबत पोहणं थांबवावं लागेल” असं कॅप्शन देत राजेश्वरीने व्हिडीओ शेअर केलाय.
View this post on Instagram
याआधी देखील राजेश्वरीने तिच्या एका डान्सचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओतून राजेश्वरीने तिच्या अदाकारीने चाहत्यांना पुरतं घायाळ केलं.
View this post on Instagram
‘फँड्री सिनेमात राजेश्वरीला कोणतेही संवाद नव्हते मात्र नजरेतून संवाद साधत राजेश्वरीने प्रेक्षकांची पसंती मिळवली. ‘फँड्री’ सिनेमातील राजेश्वरीचा साधा लूक आता पुरता बदलल्याचं दिसतंय. ग्लॅमरस लूक आणि बोल्ड अंदाजात राजेश्वरी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2021 3:24 pm