17 January 2021

News Flash

अलिबागमध्ये कतरिना-विकी एकत्र? चाहत्यांनी फोटोमध्ये शोधला विकीचा चेहरा

कतरिना कैफ आणि विकी कौशल एकमेकांना डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा आहेत.

अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल एकमेकांना डेट करत असल्याच्या जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहेत. इतकंच नव्हे तर नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी या दोघांनी एकत्र पार्टी केल्याचंही समजतंय. मात्र रिलेशनशिपबद्दल कतरिना आणि विकीने अद्याप मौन बाळगणंच पसंत केलंय. एकीकडे विकी आणि त्याचा भाऊ सनी कौशलने अलिबागमधील काही फोटो पोस्ट केले. तर दुसरीकडे कतरिना आणि तिची बहीण इसाबेलसुद्धा अलिबागमध्येच आहेत. त्यामुळे हे चौघं एकत्र असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कतरिनाने तिच्या बहिणीसोबतचे काही फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर इसाबेलनेही ते ज्या ठिकाणी राहत आहेत, तिथल्या स्विमिंग पूलजवळचे काही फोटो पोस्ट केले. शुक्रवारी, विकीनेसुद्धा भाऊ सनीसोबतचे फोटो पोस्ट केले आणि त्यातही मागे तोच स्विमिंग पूल आणि तेच बॅकग्राऊंड पाहायला मिळत आहे.

कतरिना विकीसोबत असल्याचा आणखी एक पुरावा चाहत्यांना मिळाला. शनिवारी कतरिनाने इसाबेल आणि आणखी एका तरुणीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. या दोघींच्या मागे असलेल्या काचेवर कतरिना आणि विकी कौशलचं प्रतिबिंब सहज पाहायला मिळत आहे. कतरिना फोटोतील ही गोष्ट समजताच तिने नंतर सोशल मीडियावरून तो डिलिट केला. मात्र तोपर्यंत तो व्हायरल झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by vicktrina

कतरिनाच्या घरी झालेल्या ख्रिसमस पार्टीलाही विकीने हजेरी लावली होती. विकीने वारंवार डेटिंगचं वृत्त नाकारलं. “मला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. मी माझ्या खासी आयुष्याबद्दल खोटं बोलू शकत नाही”, असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2021 10:51 am

Web Title: fans believe katrina kaif isabelle celebrated new year with vicky kaushal his brother sunny in alibaug ssv 92
Next Stories
1 ‘माझ्या नवऱ्याची बायको’मध्ये आता शनाया दिसणार की नाही? रसिकाने दिलं उत्तर..
2 संकल्पातील संकल्पना..
3 सबुरीवरच श्रद्धा!
Just Now!
X