News Flash

…म्हणून लग्नानंतर नताशा दलाल झाली ट्रोल

'या' कारणामुळे नताशा झाली ट्रोल

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल या दोघांनी नव्या वर्षात लग्नगाठ बांधली. २४ जानेवारीला अलिबागमध्ये या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. विशेष म्हणजे या दोघांचं लग्न झाल्यापासून नताशा सातत्याने चर्चेत येत आहे. यात खासकरुन तिच्या लूकची आणि लाइफस्टाइलची चर्चा होताना दिसते. मात्र,सध्या नताशा एका कारणामुळे ट्रोल होताना दिसत आहे.

सध्या नताशा दिसल्यानंतर तिची छबी कॅमेरात कैद करण्यासाठी अनेक छायाचित्रकार पुढे सरसावतात. यामध्येच नताशाचा एक फोटो पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. तिचा हा फोटो ‘वूंम्पला’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)


अलिकडेच नताशाला तिच्या घराबाहेर स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी नताशाने लाल रंगाच्या चुड्याऐवजी हातात पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घातल्या होत्या. तसंच ती वेस्टर्न आऊटफिटमध्ये होती. त्यामुळेच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

वाचा : वरुण-नताशाच्या डोक्यावर अक्षता पडताच नेटकऱ्यांनी सर्च केली ‘ही’ गोष्ट

लग्नानंतर पांढऱ्या रंगाचा चुडा का?, असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे. तर, हे असे कपडे का परिधान केलेस असंही काहींनी म्हटलं आहे. लग्नानंतर नताशा सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. नताशाचा कलाविश्वाशी यापूर्वी कधीही संबंध आला नव्हता. मात्र, आता वरुणमुळे ती सातत्याने प्रकाशझोतात येत आहे.

कोण आहे नताशा दलाल?

नताशा दलाल ही गौरी दलाल आणि राजेश दलाल यांची लेक आहे. तिचे वडील एक प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. संपूर्ण देशभरात त्यांच्या व्यवसायाचा विस्तार झालेला आहे. विशेष म्हणजे दलाल कुटुंबाचा बॉलिवूडशी कोणताही संबंध नाही. नताशा आणि वरुण यांचा प्रेमविवाह आहे. नताशाने मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. तसंच तिने फॅशन डिझायनिंग क्षेत्रात पदवीदेखील मिळवली आहे. सध्या तिचं नताशा दलाल लेबल या नावाने कपड्यांचा ब्रँण्ड आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 10:03 am

Web Title: fans gets angry after seeing varun dhawan bride natasha dalal white bangles ssj 93
Next Stories
1 ‘आम्ही दोन वर्ष लिव्ह इनमध्ये राहिलो पण..’; सिद्धार्थने सांगितली लग्नापूर्वीची गोष्ट
2 रिहानासंबंधीत केलेले कंगनाचे जुने ट्वीट चर्चेत
3 रिहानाच्या ट्वीटनंतर अक्षय कुमार, करण जोहर म्हणतात…
Just Now!
X