22 March 2019

News Flash

सैफ अली खानच्या मुलीकडे चाहत्यांनी घातली ही गळ

चाहत्यांची ही विनंती ऐकणार का सारा?

सारा अली खान

आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी बी- टाऊनच्या सेलिब्रिटींकडे सोशल नेटवर्कींग साइट्स हे एक उत्तम माध्यम असतं. ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल नेटवर्कींग साइट्सच्या माध्यमातून सेलिब्रिटींची छोट्यातील छोटी गोष्ट त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोतच असते. तरीही असे बरेच सेलिब्रिटी आहेत जे यापासून दूर आहेत आणि त्यांचे चाहते सोशल मीडियावर त्यांची वाट पाहत आहेत. सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच आपला चाहतावर्ग निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. मात्र साराचा सोशल मीडियावर एकही अकाऊंट नाही. म्हणूनच चाहत्यांनी #SaraPlzComeOnSocialMedia या हॅशटॅगच्या माध्यमातून तिला गळ घातली आहे.

ट्विटरवर #SaraPlzComeOnSocialMedia हा हॅशटॅग सध्या जोरदार ट्रेण्ड होत आहे. साराच्या चाहत्यांनी तिला सोशल मीडियावर अकाऊंट उघडण्याची विनंती केली आहे. आता चाहत्यांची ही विनंती ऐकून सारा सोशल मीडियावर पदार्पण करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.