सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही. अनेक लोकांमध्ये चित्रपटातील ताऱ्यांप्रमाणे दिसणे म्हणजेच सुंदर दिसणे, असा समज आहे. असे असले तरी चित्रपटसृष्टीतील काही ताऱ्यांनी शस्त्रक्रियेद्वारे आपल्या चेहऱ्यात केलेल्या बदलामुळे त्यांच्या दिसण्याबाबत ते खूश नसल्याचे जाणवते. त्यांचे हे बदललेले रुप पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. फॅशनच्या ट्रेण्डप्रमाणे सुंदर दिसण्याचे परिमाणदेखील काही काळानंतर बदलत राहते. या ट्रेण्डमध्ये झिरो फिगर आणि पातळ ओठ असण्यासारखे ट्रेण्ड येऊन गेले. अलिकडे हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अॅन्जलीना जोलीसारखे जाड ओठ असणे हे सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. फॅशनच्या विश्वात कापडाला ज्याप्रमाणे आपर्षक ड्रेसमध्ये रुपांतरीत करण्यासाठी कात्रीने योग्य आकारात कापले जाते, तसे हल्ली काहीजण सुंदर दिसण्याच्या ट्रेण्डला फॉलो करण्यासाठी स्वत:वर शस्त्रक्रिया करून घेत आहेत. त्याचप्रमाणे उतारवय कळू न देण्यासाठीसुद्धा काहीजण याचा अवलंब करतात.  सुंदर दिसण्यासाठी प्रामुख्याने नाक, ओठ आणि जबड्यासारख्या अवयवांवर शस्त्रक्रिया करून घेतली जाते. शस्त्रक्रियेनंतरचे परीणाम चांगले आले तर बरे! नाहीतर पंचाईत होऊन बसते.
करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या प्रसिद्ध ‘चॅट शो’चा अनुष्काबरोबरच्या मुलाखतीची झलक दाखविणारा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असून, बॉलिवूडमधील या अभिनेत्रीने पुन्हा एकदा चेहऱ्यावर शस्त्रक्रिया केल्याची चर्चा होत आहे. २००८ साली आलेल्या  ‘रब ने बना दी जोडी’ या शाहरूख खानबरोबरच्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीच्या दिसण्यात प्रकर्षाने जाणवेल, असा बदल झाला आहे.

अनुष्काच्या या बदललेल्या रुपाचे पडसाद टि्वटरवर देखील उमटत आहेत –

अनुष्काच्या ओठांना काय झाले आहे? तरुण पिढी आपल्या चेहऱ्याचे असे नुकसान का करून घेत आहे?

अनुष्का शर्मा आधी किती छान दिसायची, तिने स्वत:चे काय करून घेतले आहे? भारतातली आजची सर्वात कुरूप स्त्री?

अनुष्काने ओठांची शस्त्रक्रिया केली आहे का?

प्लॅस्टिकचे रिसायकल होत नाही. हा एक अपायकारक कचरा आहे. या मुळे दुरगामी नुकसान होते. उदा. अनुष्का शर्मा</span>

ओठांची शस्त्रक्रिया केल्यावर अनुष्का शर्मा अतिशय वाईट दिसत आहे. मुळात तिने असे करण्याची गरजच काय होती.

असे संदेश तिच्या चाहत्यांनी टि्वटरवर पोस्ट केले आहेत.

ही पहिलीच वेळ नाहीये की अनुष्काने चेहऱ्यावर शस्त्रक्रिया केल्याचे बोलले जात आहे. याआधी देखील तिने शस्त्रक्रिया केल्याची चर्चा होती. अनुष्काच्या प्रवक्याने याचे खंडण केले असले, तरी जे प्रत्याक्षात दिसत आहे ते अतिशय बोलके आहे. बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून लांब असलेली अनुष्का नऊ फेब्रुवारीला प्रसारित होणाऱ्या ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात ‘बॉम्बे वेलवेट’ या तिच्या चित्रपटाचा दिग्दर्शक अनुराग कश्यपबरोबर दिसणार आहे.
पाहा व्हिडिओ –