16 December 2017

News Flash

बिग बींच्या अनुपस्थितीतही असा साजरा झाला त्यांचा ७५ वा वाढदिवस

चाहत्यांची बिग बींना अनोखी भेट

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 11, 2017 5:59 PM

बिग बींचा आज ७५ वा वाढदिवस

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांसाठी विशेष असतो. विविध ठिकाणांहून असंख्य चाहते त्यांच्या बंगल्याबाहेर एक झलक पाहण्यासाठी, त्यांना शुभेच्छा आणि भेटवस्तू देण्यासाठी तासनतास उभे असतात. कोणी फोटो, कोणी केक तर कोणी बिग बींचे रेखाटलेले चित्र त्यांना भेट म्हणून देण्यासाठी जुहू येथील ‘जलसा’ या बंगल्याबाहेर जमतात. बिग बी मुंबईत नाहीत हे माहित असतानाही आज त्यांच्या ७५ व्या वाढदिवशी चाहते विविध भेटवस्तूंसह नेहमीप्रमाणे बंगल्याबाहेर जमले.

एका चाहत्याने गाडीवर या मेगास्टारचे विविध स्केचेस लावले तर एकाने त्यांना शुभेच्छा देणारा होर्डिंगच तयार केला आहे. दुसरा चाहता बिग बींच्या फोटोंची मोठी फ्रेम आणि फुलांचा गुच्छ घेऊन बंगल्याबाहेर उभा असलेला पाहायला मिळतोय. यावरूनच बिग बी जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव त्यांच्यावर होत राहणार हे नक्की.

PHOTO : हृतिक-करण जोहरची फरहानसोबत जंगी पार्टी

यंदा बिग बींनी आपल्या कुटुंबाला वेळ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बच्चन कुटुंब मालदीवला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले आहेत. मालदीवमध्ये क्रूजवर त्यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात येणार आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकने मिळून या सेलिब्रेशनचे नियोजन केले आहे. पुढील सात दिवस बिग बी मालदीवमध्येच राहणार आहेत.

First Published on October 11, 2017 5:59 pm

Web Title: fans wave out in excitement to wish actor amitabh bachchan on his 75th birthday