News Flash

बॉलिवूड अभिनेता देतोय मृत्यूशी झुंज; पूजा भट्टने देशवासीयांना केली मदतीची विनंती

राणी मुखर्जीला स्टार करणारा अभिनेता देतोय मृत्यूशी झुंज

बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोकपणे आपली मतं मांडते. यावेळी ती अभिनेता फराज खानमुळे चर्चेत आहे. फराज सध्या बंगळुरुमधील एक खासगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. त्याला तीसऱ्या स्टेजचा मेंदूचा कर्करोग झाल्याचं निदान झालं आहे. उपचारासाठी त्याला आर्थिक मदत करावी अशी विनंती पूजाने देशवासीयांना केली आहे.

सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी मोदींना पाठवा हा मेसेज; सुशांतच्या बहिणीचं आवाहन

“कृपया जितकं शक्य होईल तितकी मदत करा. हा मेसेज सगळीकडे व्हायरल करा. मी देखील मदत करतेय. या मदतीसाठी आम्ही आजन्म आपले उपकृत राहू.” अशा आशयाचं ट्विट करुन पूजा भट्टने मदत करण्याचं आवाहन केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

“तुमच्याकडे फाटलेले कपडे असतील तर सारा अली खानला द्या”, अभिनेत्याचं अजब आवाहन

फराज खान बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. १९९६ साली ‘फरेब’ या चित्रपटातून त्याने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. त्यांनंतर ‘पृथ्वी’, ‘मेहंदी’, ‘दुल्हन बनू में तेरी’, ‘चाँद बुझ गया’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केलं. शिवाय ‘वन प्लस वन’, ‘शूsssss कोई है’, ‘रात होने को है’, ‘करिना करिना’ यांसारख्या काही मालिकांमध्ये देखील त्याने काम केलं होतं. परंतु २००८ नंतर त्याला फारसं काम मिळलं नाही. त्याच दरम्यान त्याला कर्करोग देखील झाला. परिणामी अभिनयापासून हळूहळू तो दूर होत गेला. सध्या बंगळुरुमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 4:48 pm

Web Title: faraaz khan needs money for treatment pooja bhatt mppg 94
Next Stories
1 ‘अतरंगी रे’च्या दोन आठवड्यांच्या शुटिंगसाठी अक्षय कुमारने घेतले इतके मानधन
2 Video : ‘एक,दो, तीन’! वर्कआऊटचा कंटाळा आल्यानं इशानं बघा काय केलं?
3 निक्की तांबोळीमुळे साराच्या डोळ्याला दुखापत; ‘बिग बॉस’मध्ये एडिट केला सीन
Just Now!
X