23 September 2020

News Flash

‘आत्मनिर्भर भारता’चा उल्लेख करत फराह खानने मोदींना दिल्या शुभेच्छा

एकाच ट्विटमध्ये मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि कोपरखळी

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. नरेंद्र मोदींनी आज वयाच्या ७० व्या वर्षात पदार्पण केले. मोदी हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. जनमानसता त्यांची एक खास प्रतिमा आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींना सर्वपक्षीय नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान अभिनेत्री फराह खान अली हिने देखील मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे शुभेच्छा देत असताना तिने ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेवरुन मोदींना हलकीशी कोपरखळी देखील मारली आहे.

“पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वेगाने घसरणारी अर्थव्यवस्था, बेरोजगारी, धार्मिक मतभेद यांसारख्या मुद्द्यांना मोदी सोडवतील अशी अपेक्षा आहे. लवकरच भारत सुपरपावर होईल अशी स्वप्न मी पाहतेय. आपल्या देशात समानता असेल आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर असू” अशा आशयाचं ट्विट करुन फराह खानने मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. फाराहने आजवर अनेकदा नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. केंद्राने घेतलेल्या अनेक निर्णयांचा तिने विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर शुभेच्छांच्या माध्यमातून तिने मोदींना कोपरखळी मारली असं म्हटलं जात आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 1:15 pm

Web Title: farah khan ali narendra modi birthday wishes mppg 94
Next Stories
1 अभिनेत्री राजेश्वरी सचदेव करोना पॉझिटिव्ह
2 निवडणूकीचं तिकिट मागणाऱ्याला सोनू सूदचा भन्नाट रिप्लाय
3 “बॉलिवूडमधल्या ड्रग्ज माफियांची नावं उघड कर”; उर्मिला मातोंडकरचं कंगनाला आव्हान
Just Now!
X