News Flash

अखेर फराह खानला मागावी लागली माफी

अजनाला येथे त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान फराह खान, अभिनेत्री रवीना टंडन आणि भारती सिंह यांनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. त्यावरुन या तीन लोकप्रिय अभिनेत्रींविरोधात पंजाब येथे गुन्हा दाखल करण्यात आला. आता फराह खानने या प्रकरणी माफी मागितली आहे.

फराह खानने ट्विट करत लोकांची माफी मागितली आहे. ‘नुकताच प्रदर्शित झालेल्या माझ्या शोमधील एका एपिसोडमध्ये अनावधानाने धार्मिक भावना दुखावल्या गेल्या त्याबद्दल मला फार वाईट वाटले. मी प्रत्येक धर्माचा आदर करते आणि एखाद्या धर्माचा अनादर करणे हा माझा उद्देश नव्हता. रवीना टंडन, भारती सिंह, मी आणि माझ्या संपूर्ण टीमच्या वतीने मी माफी मागते’ असे फराहने ट्विट करत माफी मागितली आहे.

आणखी वाचा : फराह खान, रवीना टंडन आणि भारती सिंह विरुद्ध गुन्हा दाखल

रवीना, फराह आणि भारतीने एका कॉमेडी कार्यक्रमादरम्यान धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी तक्रार देण्यात आली होती. त्यांनी वापरलेले शब्द धर्माचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हा भाग ख्रिसमसच्या मूहुर्तावर प्रदर्शित झाला. तक्रारीवरुन अजनाला येथे त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 27, 2019 5:09 pm

Web Title: farah khan apologize for hurting religious sentiments avb 95
Next Stories
1 अभिनेत्रीने हातावर गोंदवलं लैंगिक अत्याचार करणाऱ्याचं नाव
2 प्रभासच्या लग्नाबाबत कुटुंबातल्या सदस्यानेच केला मोठा खुलासा..
3 वाढदिवशी सलमानला मिळाले मोठे गिफ्ट
Just Now!
X