21 January 2021

News Flash

एकेकाळी अडगळीच्या खोलीत रहायची फराह खान; असा होता संघर्षप्रवास

लहान असताना फराहच्या कुटुंबीयांवर ओढावलं होतं 'हे' संकट

आपल्या तालावर प्रत्येक बॉलिवूड कलाकाराला ठेका धरायला लावणारी नृत्यदिग्दर्शिका म्हणजे फराह खान. जवळपास १०० पेक्षा अधिक गाण्यांचं कोरिओग्राफ फराहने केलं आहे. त्यामुळे फराह खान बॉलिवूडमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. आपल्या नृत्यकौशल्याच्या जोरावर यश मिळवणाऱ्या फराहचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. एका मुलाखतीत तिने तिच्या बालपणींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यात एकेकाळी त्यांना हालाखीचं जीवन जगण्याची वेळ आली होती, असं तिने सांगितलं
९ जानेवारी १९६५ मध्ये फराहचा जन्म झाला. त्यावेळी तिचे वडील कमरान हे बी-ग्रेड चित्रपटांचे दिग्दर्शक, निर्मिता आणि अभिनेता होता. या काळात त्यांनी ऐसा भी होता है या ए-ग्रेड चित्रपटाची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला. त्यानंतर फरहाच्या कुटुंबावर कर्जाचा डोंगर झाला आणि येथूनच त्यांच्या संघर्षाचे दिवस सुरु झाले.

“वयाच्या ५ वर्षांपर्यंत माझं बालपण खूप छान गेले. माझे वडील दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता होते. पण, ते बी-ग्रेट सिनेमांचे. त्यांनी एक ए-ग्रेड चित्रपट करण्याचा निर्णय घेतला आणि तो फ्लॉप झाला. त्यानंतर रातोरात आमचं आयुष्य बदलून गेलं. या घटनेनंतर जवळपास १५ वर्ष आम्ही स्ट्रगल केला”, असं फराह म्हणाली.

पुढे ती म्हणते, “आम्ही अडगळीच्या खोलीमध्ये राहून दिवस काढले. पण आमच्याकडे सगळं सुरळीत सुरु आहे असंच मी कायम शाळेत दाखवायचे. याच काळात वडिलांचं आजारपणात निधन झालं आणि सगळी जबाबदारी माझ्यावर पडली. मी चित्रपटांमध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करु लागले. कधी-कधी मी कलाकारांनादेखील काही डान्स स्टेप्सही शिकवल्या.बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करत असतानाचा १९९३ मध्ये जो जीता वही सिकंदर या चित्रपटातील गाण्यांची कोरिओग्राफी सरोज खान यांनी मध्येच बंद केली. त्यानंतर मला पहला नशा हे गाणं कोरिओग्राफ करण्याची संधी मिळाली. हे गाणं प्रचंड लोकप्रिय ठरलं. त्यानंतर शाहरुख खानच्या चित्रपटातील कभी हा कभी ना हे गाणं करण्याची संधी मिळाली.”

दरम्यान, नृत्यदिग्दर्शिका असण्यासोबतच फराह चित्रपट दिग्दर्शिकादेखील आहे. तिच्या दिग्दर्शनाखाली ‘मैं हूं ना’ हा चित्रपट तयार करण्यात आला. त्यानंतर फराहने ‘ओम शांती ओम’, ‘हॅप्पी न्यू इअर’, ‘तीस मार खान’ सारखे चित्रपट केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2021 10:52 am

Web Title: farah khan birthday shocking revelations about childhood ssj 93
Next Stories
1 जगन शक्तींच्या मानधनात वाढ; अक्षय कुमारसोबत काम करण्यासाठी घेतली इतकी फी
2 प्रियांकाने मोडले लॉकडाउनचे नियम? स्पष्टीकरण देत म्हणाली…
3 अनीता हसनंदानीने बेबी बंपसह केला शकिरा डान्स, व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X